Share

कोरोना लसीचे दोन डोस घेणाऱ्यांना मिळणार ५ हजार रुपये? सरकार म्हणतंय…

दोन वर्षांपासून देशात कोरोनाने धुमाकूळ घातला होता. त्यापासून बचाव करण्यासाठी कोरोना लस देखील दिली जात होती. अनेक ठिकाणी कोरोना लस बंधनकारक केली होती. त्यामुळे सर्वांनीच कोरोना लस घेतली. अशात सोशल मीडियावर एक व्हायरल होत आहे. (corona vaccine viral message)

कोरोना लस घेतलेल्या लोकांना सरकारकडून ५ हजार रुपये मिळतील असा एक मेसेज सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. एक फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला ते पैसे दिले जातील असे मेसेजमध्ये म्हटले आहे. पण हा एक खोटा मेसेज असल्याचे सरकारने म्हटले आहे.

एका व्हायरल मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की ज्या लोकांना कोरोनाची लस मिळाली आहे, त्या लोकांना फक्त एक फॉर्म भरावा लागेल आणि त्यानंतर सरकार तुम्हाला पूर्ण ५ हजार रुपये देईल. हा मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर दररोज अनेक प्रकारचे मेसेज व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये अनेक प्रकारचे दावे केले जात आहेत. लस दिल्यानंतर ५ हजार रुपये मिळाल्याच्या या दाव्याची सत्यता जाणून घेण्यासाठी सरकारी एजन्सी पीआयबीने तथ्य तपासणी केली आहे.

पीआयबीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, व्हायरल झालेल्या मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की ज्यांना कोविडची लस मिळाली आहे. त्यांना ऑनलाइन फॉर्म भरल्यानंतर पंतप्रधानांच्या कल्याण विभागाकडून ५ हजार रुपये दिले जातील. पण हा मेसेज खोटा आहे. कृपया हा फेक मेसेज फॉरवर्ड करू नका.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अशा मेसेजपासून सर्वांनी सावध राहावे, असे पीआयबीने म्हटले आहे. पीआयबीने लोकांना असे मेसेज फॉरवर्ड न करण्यास सांगितले आहे. अशा मेसेजद्वारे दिशाभूल करून, तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती आणि पैसे धोक्यात आणत असतात, असेही पीआयबीने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
‘नव्या अशोक स्तंभावरील सिंह हा स्वतंत्र भारतातील, गरज लागली तर…’ अनुपम खेर यांच्या ट्विटची चर्चा
प्रसिद्धीपासून दूर राहून कतरिना कैफ करतेय ‘हे’ काम; ऐकून तुमचे होश उडतील
बाजार उजळला, सेन्सेक्स २६० अंकांनी वाढून ५४००० पार; निफ्टीने ‘इतकी’ वाढ नोंदवली

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now