Share

कोरोना लसीने केला घात, शेतकऱ्याने गमावला डावा हात, उपचारासाठी लाखो रुपये खर्च

सध्या महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने नागरिक लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर गर्दी करत आहेत. मात्र, महाराष्ट्रातील नांदगाव पेठ येथील शेतकऱ्याला कोरोनाच्या लसीमुळे हात गमवावा लागला आहे. लाखो रुपये खर्च करून देखील काहीही परिणाम न झाल्याने त्या शेतकऱ्याचे कुटुंब आर्थिक विवंचनेत सापडले आहे.

हरिदास सूर्यभानजी याउल (५८) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्याने स्थानिक आरोग्य उपकेंद्रात २३ एप्रिल २०२१ रोजी पहिली लस घेतली होती. लस घेतल्यापासून त्यांचा डावा हात बधिर झाला होता. त्यानंतर लसीचा दुसरा डोस त्या शेतकऱ्याने जुलै महिन्यात घेतला. लसीचा दुसरा डोस घेतल्यापासून त्यांचा डावा हात पूर्णतः निकामी झाला आहे.

यांनतर हरिदास यांनी अमरावती आणि नागपूर या शहरातील विविध रुग्णालयात उपचार घेतले. पण हरिदास यांच्या हातामध्ये काहीच फरक पडला नाही. सध्या त्यांच्यावर फिजिओथेरपीचे उपचार सुरु आहेत. पण या थेरपीचा देखील त्यांच्यावर परिणाम शून्य आहे. गेल्या आठ महिन्यांपासून ते या हातामुळे त्रस्त झाले आहेत.

त्यांना शेतातील कामे करताना अडचणी येत आहेत. त्यांना मजुरांच्या भरवशावर शेतीची कामे करावी लागत आहे. यापूर्वी ते स्वतः दुचाकी चालवत होते. परंतु, आता कोणत्याही कामासाठी त्यांना दुसऱ्या व्यक्तींचा आधार घ्यावा लागत आहे. आता उर्वरित आयुष्यजगावे तरी कसे असा प्रश्न हरिदास यांना पडला आहे.

या प्रकरणाबाबत माहिती देताना वैद्यकीय अधिकारी डॉ.रवींद्र शिरसाठ म्हणाले की, ‘हरिदास याउल यांच्याशी माझे बोलणे झाले. त्यांना उद्भवलेली समस्या नेमकी कशामुळे आहे याचा तपास करण्यात येईल. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील विशेषज्ञाकडून तपासणीकरून त्यांना सर्वोतोपरी सहकार्य विभागाच्या वतीने करण्यात येईल.नागरिकांनी गोंधळून न जाता लसीकरण करून घ्यावे.’

हरिदास यांच्यासोबत घडलेल्या प्रकारची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होत आहे. सध्या मोठ्या प्रमाणात लसीकरणाचा वेग सुरू असताना झालेल्या या घटनेमुळे वयस्कर नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यापूर्वी देखील महाराष्ट्रात लस घेतल्यामुळे मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. पण लस घेतल्यामुळे हात निकामी झाल्याची पहिलीच घटना समोर आली आहे.

महत्वाच्या बातम्या :-
कोण पाठीशी उभं नाही राहीलं तरी मी एकटा लढणार; अभिनेते किरण मानेंचा एल्गार
“हा तर दडपशाही वृत्तींनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा केलेला निर्घृण खुनच”, आमदार रोहित पवार संतापले
सैन्यातील जवानाच्या पत्नीवर दिराचा १८ वर्षे बलात्कार; दिर भावजयीच्या नात्याला काळीमा

राज्य

Join WhatsApp

Join Now