Homeताज्या बातम्यासैन्यातील जवानाच्या पत्नीवर दिराचा १८ वर्षे बलात्कार; दिर भावजयीच्या नात्याला काळीमा

सैन्यातील जवानाच्या पत्नीवर दिराचा १८ वर्षे बलात्कार; दिर भावजयीच्या नात्याला काळीमा

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे एक नराधम आपल्या लहान भावाच्या पत्नीवर गेल्या 18 वर्षांपासून बलात्कार करत होता. महिलेचा पती सैन्यात काम करतो त्यामुळे तो जास्तवेळ तर घराबाहेरच ड्युटीवर असायचा. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जेव्हा महिलेने आपल्या मोठ्या भावाच्या कृत्याबद्दल आपल्या पतीला सांगितले तेव्हा त्यानेही आपल्या मोठ्या भावाची बाजू घेतली.

घरात राहायचे असेल तर हे सर्व सहन करावे लागेल, असे पतीने पत्नीला सुनावले. यानंतर महिलेने हिंमत दाखवत पती आणि मेहुण्याविरुद्ध थाटीपूर पोलिस ठाण्यात बळजबरीने बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला. महिलेने पोलिसांना सांगितले की, 2003 मध्ये दिराने पहिल्यांदा तिच्यासोबत हे कृत्य केले होते.

तिचं नुकतंच लग्न झालं तेव्हा ती अवघ्या १९ वर्षांची होती, घरच्यांची इज्जत जाईल म्हणून ती शांत राहिली होती पण तिने हे सगळं तिच्या पतीला सांगितले होते. पण तिचं म्हणणं ऐकून न घेता तिला साथ दिली नाही. उलट त्याने तिलाच सुनावले. तिने अनेकवेळा दिराचा विरोध केला पण त्याने तिला मारण्याची धमकी दिल्याचे महिलेने सांगितले.

अनेक दिवस ती गप्प राहिली. यानंतर दिराने रोज तिच्यावर बलात्कार करण्यास सुरूवात केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाच्या तपासाच्या आधारे कठोर कारवाई केली जाईल. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही भावांविरुद्ध गुन्हा दाखल करून बलात्कार करणाऱ्या दिराला अटक केली.

याबाबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजेश दंडोतिया यांनी सांगितले की, ही महिला भिंड येथील रहिवासी आहे. तिचा नवरा लष्करात असून गेल्या अनेक वर्षांपासून तिचा दिर तिच्यावर बलात्कार करत असल्याचा आरोप तिने केला आहे. महिलेने याबाबत पतीला माहिती दिली असता त्याने सांगितले की, जर तिला घरी राहायचे असेल तर हे सर्व सहन करावे लागेल.

महिलेच्या दिरावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. अनेक वर्ष बलात्कार होऊनही महिला गप्प का राहिली असे प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे तिच्या पतीनेही भावाची बाजू घेतल्याने पतीलाही कडक शिक्षा व्हावी अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

महत्वाच्या बातम्या
एका कुटुंबाला 22 वर्षांनंतर सापडले चोरीचे सोने, त्याची आजची किंमत ऐकून तुमचे देखील डोळे फिरतील…
भरमसाठ होमलोन घेण्यापेक्षा भाड्याच्या घरात राहणे फायद्याचे; हप्त्याच्या पैशात येतील 2-3 घरे
“इंदुरीकरांवर कारवाई करा, अन्यथा अंधश्रद्धा पसरविण्यात ठाकरे सरकार सुद्धा सामील असे वाटेल”
वसंत मोरेंची एक फेसबूक पोस्ट अन् मृत्युशी झुंझ देणाऱ्या चेतनच्या उपचारासाठी जमले तब्बल १४ लाख रुपये