Homeताज्या बातम्या"हा तर दडपशाही वृत्तींनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा केलेला निर्घृण खुनच", आमदार रोहित पवार...

“हा तर दडपशाही वृत्तींनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा केलेला निर्घृण खुनच”, आमदार रोहित पवार संतापले

राजकीय भूमिका मांडल्यामुळे स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या लोकप्रिय मालिकेतून अभिनेता किरण माने यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. या घटनेचे पडसाद आता सोशल मीडिया, मनोरंजन क्षेत्रासह राजकीय पटलावरही उमटू लागले आहेत. अभिनेता किरण माने यांच्याविरुद्ध घडलेल्या या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी निषेध केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. “अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दडपशाही वृत्तींना मोठा अडसर असल्याने ही वृत्ती नेहमीच अभिव्यक्ती स्वातंत्र्य ठेचण्याचा प्रयत्न करते. राजकीय भूमिका मांडली असता एखाद्या कलाकाराला मालिका सोडण्याची वेळ यावी; याला दडपशाही वृत्तींनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा केलेला निर्घृण खुनच म्हणावा लागेल”, असे आमदार रोहित पवार ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

आज अभिनेता किरण माने यांनी फेसबुकवर यासंदर्भात एक पोस्ट टाकली आहे. ‘काल टो जुबान, आंसुओं से गाऊंगा… गाड दो, बीज हूँ मैं. पेड बन ही जाऊंगा!’, असे अभिनेता किरण माने यांनी पोस्ट मध्ये लिहले आहे. अभिनेता किरण माने यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यांच्या चाहत्यांनी आय स्टॅन्ड विथ किरण माने असा हॅशटॅग वापरून त्यांना पाठिंबा दर्शविला आहे.

एका मुलाखतीमध्ये अभिनेता किरण माने यांनी सांगितले की, “महाराष्ट्रातील नागरिकांच्या दुर्दैवानं ही बातमी खरी आहे. मला माझ्या राजकीय भूमिकेमुळे ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून काढण्यात आलं आहे. तुम्ही सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठवायचा नाही किंवा तुम्ही कुठल्या विचारधारेविरोधात आवाज उठवायचा नाही. नाहीतर आम्ही तुमच्या पोटावर पाय आणू, तुमचं जगणं मुश्किल करु असा एक संदेश देण्याचा प्रयत्न यातून झाला आहे.”

“बघू आता एका कलाकारासाठी किती लोक, कोणता राजकीय पक्ष माझ्या मागे उभा राहतो. आणि जर कुणीही नाही माझ्यामागे उभा राहिला तरी मी तुकाराम महाराजांचा भक्त आहे, शिवाजी महाराजांचा भक्त आहे, वारकरी संप्रदायाचा आहे. मी एकटा लढेन. माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुणी हिरावून घेऊ शकणार नाही”, अशी संतप्त प्रतिक्रिया अभिनेता किरण माने यांनी या घटनेवर दिली आहे.

अभिनेता किरण माने यांच्याविरुद्ध घडलेल्या या घटनेचा काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी निषेध केला आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. ‘हा भाजपचा सांस्कृतिक दहशतवाद आहे. भाजप विरोधात बोलण्याची हिमंत कशी होते हा दभं त्यामागे आहे.’ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील ट्विट करत या घटनेचा निषेध केला आहे.

महत्वाच्या बातम्या :-
सैन्यातील जवानाच्या पत्नीवर दिराचा १८ वर्षे बलात्कार; दिर भावजयीच्या नात्याला काळीमा
एका कुटुंबाला 22 वर्षांनंतर सापडले चोरीचे सोने, त्याची आजची किंमत ऐकून तुमचे देखील डोळे फिरतील…
भरमसाठ होमलोन घेण्यापेक्षा भाड्याच्या घरात राहणे फायद्याचे; हप्त्याच्या पैशात येतील 2-3 घरे

ताज्या बातम्या