Congress | निवडणूक आयोगाकडून सोमवारी अंधेरी पुर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार १४ ऑक्टोबरपर्यंत या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. पण त्याआधीच काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे.
अंधेरी पुर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे अंधेरी पुर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागलेली आहे. याबाबत काँग्रेसने मोठी घोषणा केली आहे. काँग्रेस आपला उमेदवार देणार नसून महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोलेंनी स्वता ही घोषणा केली आहे. यावेळी नाना पटोले म्हणाले की, विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर जातीयवादी धर्मांत भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन झाली होती.
अडीच वर्षे या महाविकास आघाडीचं सरकार होतं. या सरकारने शेतकरी कर्जमाफी सारखे अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले होते. कोरोनासारख्या महाभयंकर संकटकाळात देशात सर्वोत्तम काम केल्याचे नाना पटोले यावेळी म्हणाले. पुढे त्यांनी भाजप आणि ईडीवर निशाणा साधला.
सत्तापिपासू भारतीय जनता पक्षाने ईडी सीबीआय या केंद्रीय संस्थांचा दुरूपयोग करून शिवसेनेच्या आमदारांना फोडून महाविकास आघाडी सरकार पाडले. महाविकास आघाडी फोडण्याचे प्रयत्न भाजपने केले ते यशस्वी झाले नाहीत म्हणून त्यांनी शिवसेना पक्ष फोडला.
भारतीय जनता पक्षाविरोधातील या लढाईत महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे अंधेरी पुर्व विधानसभा पोटनिवडणूकीत काँग्रेस पक्ष आपला उमेदवार देणार नसून शिवसेना पक्ष जो उमेदवार देईल त्याला निवडून आणण्यासाठी काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते पुर्ण ताकदीने काम करतील असं नाना पटोले म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
MNS : ‘टोमणे मेळाव्याची तयारी सुरू..मर्द छाताड, खंजीर, कोथळा, बॉम्ब, बाप पळवणारी टोळी’
shinde group : निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवले तर ‘हे’ असणार शिंदे गटाचे नवे चिन्ह, आधीच केलीये पुढील तयारी
Shinde group : शिंदे गटाच्या मेळाव्यात ‘या’ दिग्गज नेत्याची खुर्ची असणार रिकामी, चर्चांना उधाण
Shinde group : शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला येणाऱ्यास मिळणार प्रत्येकी १ हजार रुपये?