महाविकास आघाडी सरकार कोसळणार? शिवसेनेनंतर काँग्रेसचे पाच आमदारही नॉट रिचेबल

विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडी सरकारला मोठा दणका दिला. विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीत शिवसेनेची काही मते फुटल्याचे समोर आले. यादरम्यान काल संध्याकाळपासून शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत.

शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ३५ आमदार असल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे नेमके कोणते आमदार आहेत? त्यांची यादीही समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे पक्षावर नाराज होते.

सध्या ठाकरे सरकार त्यांची समजूत काढण्यामध्ये व्यस्त आहे. त्यातच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसचेही ५ आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. पण हे पाच आमदार नेमके कोणत्या पक्षाच्या संपर्कात आहेत हे अद्याप समोर आलेले नाही.

या बातमीमुळे काँग्रेसमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. महाविकास आघाडी कोणत्याही क्षणी कोसळेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपने पुर्ण सापळा रचून ठाकरे सरकारला कोंडित पकडण्याचा प्लॅन आधीच रचला होता. त्यामध्ये फडणवीसांचाही मोठा वाटा होता. अमित शहा यांच्याशीही चर्चा झाली होती.

यादरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. शिवसेना आमदारांवर हल्ले केले जात आहेत, असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज मुंबईत प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या नाराजी नाट्यावरून भाजपवर निशाणा साधला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, “अनेक आमदारांच्या कुटुंबियांनी तक्रार केली आहे. अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांच्या पत्नीने तक्रार केली आहे की जबरदस्तीने त्यांचं अपहरण करून त्यांना सुरतला नेण्यात आलं आहे आणि त्यांच्या जीवाला धोका आहे”, असे शिवसेना नेते संजय राऊतयांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या
आम्हाला काँग्रेस राष्ट्रवादीसोबतचे सरकार मान्य नाही, सेनेच्या बंडखोर आमदारांनी मांडली त्यांची बाजू; वाचा नेमकं काय म्हणाले ..
बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, सत्तेसाठी आम्ही कधीही…
चुकीला माफी नाही! एकनाथ शिंदेंना पहिला ‘ठाकरी’ झटका ! शिवसेनेच्या गटनेतेपदावरून उचलबांगडी
एकनाथ शिंदेंनी शिवसेनेसमोर ठेवली ‘ही’ मोठी अट; म्हणाले, चर्चा करणार पण त्यासाठी…