मुंबईतून (Mumbai) एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राजकीय (political) वर्तुळात मोठे फेरबदल सुरू आहे. अशातच मुंबई शहरात मनसेला मोठा धक्का बसला आहे. नवी मुंबई उपशहर प्रमुख प्रसाद घोरपडे (Prasad Ghorpade) यांच्यासह अन्य पाच जणांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.
दरम्यान दोन दिवसांपूर्वी ठाणे येथे पक्षाचा वर्धापन दिन पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपणच सत्तेत येणार अशी घोषणा कार्यकर्त्यांनी केली. मात्र दुसरीकडे लगेचच पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. प्रवीण गाडेकर, उपविभाग अध्यक्ष चंद्रकांत सपकाळ, उपविभाग अध्यक्ष रोहन चव्हाण, सुशांत सैद आणि रोहित सैद यात सर्व शाखा अध्यक्षांचा समावेश आहे.
याच कारण गजानन काळे यांच्या जाचाला कंटाळून पदाचा राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे. सर्व कार्यकर्त्यांनी मिळून पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहिल आहे. या पत्रामध्ये गजानन काळे यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचं कार्यकर्त्यांनी म्हटल आहे. त्याचवेळी पत्रकार परिषद घेऊन गजानन काळे यांच्यावर आरोपही करण्यात आले आहेत.
माध्यमांशी संवाद साधताना घोरपडे म्हणाले की, आम्हाला पक्षात काम करण्याचे स्वातंत्र्य नाही, काही बोलताही येत नाही आणि काही करताही येत नाही. समाजोपयोगी कामासंदर्भात नवी मुंबई महानगर पालिकेसोबत पत्र व्यवहार केल्यावर आम्हाला पालिकेचे अधिकारी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाहीत.
तसेच, त्या संदर्भात विचारपूस केल्यास शहर प्रमुख यांच्यासोबत आर्थिक हितसंबंध असल्याचे सांगितले जाते. आम्ही या संदर्भात काहीच करू शकत नाही असे सांगितले जाते. यावेळी आपण जनतेला न्याय देऊ शकत नाही. त्यामुळे पदावर राहून उपयोग काय? असा प्रश्न उपस्थित करत घोरपडे यांनी पदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले.
यादरम्यान, गजानन काळे यांनी मला माझ्या कार्यालयात येऊन धमकी दिली. त्यानंतर मारण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र, मी त्यावेळी पक्षाचा अधिकारी असल्याने प्रकरण दाबले. आता हे असाय झाले आहे. त्यामुळे मी आणि आणखी पाच जणांनी पदाचा राजीनामा दिला आहे.तसेच, आम्ही अजून तरी दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार केलेला नाही, असेही त्यांनी सांगितले. यापुढे आता वरिष्ठ नेते राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांविषयी काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
शिंदे गटातील बड्या आमदाराचा नगरसेविकेसोबतचा अश्लील व्हिडीओ व्हायरल, आता आमदारपुत्र म्हणतोय..
हनुमान चालिसाचा YouTube वर ऐतिहासिक विक्रम, आतापर्यंत ‘इतक्या’ अब्ज लोकांनी पाहिला व्हिडिओ
15 कोटींसाठी केला अभिनेते सतीश कौशिक यांचा खून, फार्महाऊसच्या मालकानेच केला घात