Shivsena: मुंबईत एक संतापजनक घटना घडली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीत सहभागी झाले होते. या रॅलीतील शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा व्हिडिओ माॅर्फ करून त्यावर अश्लील मजकूर लिहून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे .
दहिसरमध्ये एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या रॅलीसाठी उपस्थित होते. त्याचवेळी शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. त्यानंतर ते दोघेही रॅलीत सहभागी झाले. या रॅलीतील एक व्हिडिओ अज्ञात व्यक्तींनी एडिट केला आहे.
त्यानंतर या व्हिडिओवर अश्लील शब्दात मजकूर लिहून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. या माॅर्फत व्हिडिओची माहिती मिळाल्यानंतर आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांनी मध्यरात्री दहिसर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यावेळी त्याने रीतसर तक्रार दाखल केली.
हा व्हिडिओ मातोश्री नावाच्या फेसबुक पेजवरून पोस्ट करण्यात आल्याचे सांगितले. व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी विनयभंगासारखा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. ही तक्रार रात्री ३ वाजताच्या दरम्यान करण्यात आली आहे. त्याचवेळी हा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने व्हायरल केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिकांनी रात्रभर दहिसर पोलीस ठाण्यात गोंधळ घालत. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ आरोपीचा शोध सुरू केला आहे. या घटनेबाबत एका आरोपीला अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. यादरम्यान शिवसैनिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
यादरम्यान, शीतल म्हात्रे म्हणाल्या की, जेव्हा काही सुचत नाही, तेव्हा स्त्रीच्या चारित्र्यावर बोललं जातं. तिला कमी लेखून तिचं राजकारणात खच्चीकरण केलं जातं. यापूर्वी देखील अनेकदा मला राजकारणात असे अनुभव आले आहेत. या प्रकरणामागे नक्की कोण आहे? याचा पोलीस लवकरच शोध घेतील. तसेच त्यांनी या घटनेचा निषेध नोंदविला आहे.
महत्वाच्या बातम्या
हनुमान चालिसाचा YouTube वर ऐतिहासिक विक्रम, आतापर्यंत ‘इतक्या’ अब्ज लोकांनी पाहिला व्हिडिओ
15 कोटींसाठी केला अभिनेते सतीश कौशिक यांचा खून, फार्महाऊसच्या मालकानेच केला घात
फक्त ७५ घरे असलेल्या ‘या’ गावाने देशाला आजवर दिलेत ४७ IAS आणि IPS अधिकारी; वाचा त्या गावाची भन्नाट स्टोरी