Share

शेतजमीन खरेदी-विक्रीच्या नियमात झाले मोठे बदल, शासनाने जारी केले परिपत्रक

महाराष्ट्रात शेतजमीन खरेदी-विक्रीच्या नियमात काही बदल करण्यात आले आहेत. यासंबंधीचे परिपत्रक नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांनी जुलै महिन्यात जारी केलं होतं. त्यानुसार गुंठ्यांमध्ये शेतजमीन खरेदी करण्यावर निर्बंध आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.

अनेक शेतकऱ्यांनी हे परिपत्रक रद्द करण्याची मागणी केली आहे पण हे परिपत्रक रद्द होणार नाही अशी माहिती मुद्रांक व नियंत्रक श्रावण हार्डिकर यांनी दिली आहे. नवीन नियमांनुसार महाराष्ट्रात १,२,३ अशी गुंठ्यांमध्ये जमीन खरेदी करायची असेल तर त्या जमिनीचा आधी ले-आऊट असणे आवश्यक आहे.

ले-आऊट नसेल तर तुम्हाला शेतजमीन खरेदी करता येणार नाही. जर जमीन खरेदी करायची असेल तर तुम्हाला तीन महत्वाच्या सुचना लक्षात असणे आवश्यक आहे. पहिली सुचना अशी आहे की, जर एखाद्या सर्व्हे नंबरचे क्षेत्र दोन एकर आहे. त्याच सर्वे नंबरमधील तुम्ही एक, दोन अथवा तीन गुंठे जागा विकत घेणार असाल तर त्याची दस्त नोंदणी नाही.

म्हणजे तुम्ही ती शेतजमीन विकत घेतली तरी ती तुमच्या नावावर होणार नाही. मात्र त्याच सर्वे नंबरचा ले-आऊट करून त्यामध्ये एक, दोन गुंठ्याचे तुकडे पाडून त्यास जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेतली असेल तर अशा मान्य ले-आऊटमधील एक, दोन गुंठे जमिनीच्या व्यवहाराची दस्त नोंदणी होऊ शकणार नाही.

दुसरी सुचना अशी आहे की, यापूर्वीच एखाद्या पक्षकाराने प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी तुकड्याची खरेदी केली असेल अशा तुकड्याच्या खरेदी-विक्री व्यवहारासाठीसुद्धा सक्षम प्राधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. सक्षम प्राधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय तुमचे काम होणार नाही.

एखादा वेगळ्या निर्माण झालेल्या तुकड्याची शासन भूमी अभिलेख विभागामार्फत हद्दी निश्चित होऊन किंवा मोजणी होऊन त्याचा स्वतंत्र हद्द निश्चितीचा मोजणी नकाशा देण्यात आला असेल, अशा क्षेत्राचे विक्री करण्यासाठी परवानगीची आवश्यकता राहणार नाही. पण, जर अशा तुकड्याचं विभाजन करणार असाल तर मात्र त्याला वरील अटी व शर्ती लागू राहतील. यापुढे कधीही तुम्ही शेतजमीन खरेदी करण्यासाठी जाल तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा.

महत्वाच्या बातम्या
अरे यांना कोणीतरी आवरा! औरंगाबादेत चालत्या दुचाकीवर प्रेमीयुगुलाचे अश्लील चाळे, पहा व्हिडीओ
दारूने तंगाट असलेल्या आर्यन खानने एअरपोर्टवर केली लघवी? ‘जाणून घ्या’ व्हायरल व्हिडिओतील सत्य
बेरोजगारी, कर्जबाजारीला कंटाळून इंजिनीअर मुलाने आईचा केला खून, नंतर स्वत:लाही संपवलं
आयटम म्हणत मुलीची छेड काढणे पोलिस पुत्राला पडले महागात, मुलीने ‘असा’ शिकवला धडा

शेती

Join WhatsApp

Join Now