Homeताज्या बातम्याआयटम म्हणत मुलीची छेड काढणे पोलिस पुत्राला पडले महागात, मुलीने ‘असा’ शिकवला...

आयटम म्हणत मुलीची छेड काढणे पोलिस पुत्राला पडले महागात, मुलीने ‘असा’ शिकवला धडा

गेल्या काही महिन्यांपासून महिला अत्याचाऱ्याच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. अशात औरंगाबादमध्ये तरुणीची छेड काढणाऱ्या रोड रोमिओंना एक मुलीने चांगलाच धडा शिकवला आहे. छेड काढणाऱ्या एका मुलाविरोधात एका विद्यार्थीनीने पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

औरंगाबाद शहरातील एमजीएम विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थीने तीन तरुणांना धडा शिकवला आहे. यामध्ये धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यातल्या ज्या एका तरुणाने मुलीची छेड काढली तो पोलिस पुत्र होता. विद्यार्थीने आरोपी प्रतीक राजेश भोटकरसह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मुलीने राजेश, त्याचा मित्र पियुष चंद्रकांत देशमुख याच्यासह आणखी एका तरुणावर हा गुन्हा दाखल केला आहे. विनयभंगासह, मारहाण करणे आणि धमकी देण्याच्या आरोपांखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिडको पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

एमजीएम विद्यापीठातील एक विद्यार्थीनी आपल्या तीन मित्रांसोबत चहा पिण्यासाठी विद्यापीठासमोरील एका हॉटेलमध्ये गेली होती. याचवेळी पोलिस पुत्रासह त्याचे दोन मित्र आले होते. त्यावेळी पोलिस पुत्राने मुलीला आयटम म्हणत वाईट नजरेने बघत इशारा केला.

घडलेल्या प्रकाराबाबत विद्यार्थीनीने सोबतच्या मित्रांना सांगितले. त्यानंतर तिच्या मित्रांनी पोलिस पुत्राला जाब विचारला. त्यानंतर त्यांच्यामध्ये वाद झाला. त्यामुळे विद्यार्थीनीने थेट सिडको पोलिस ठाणे गाठत पोलिस पुत्रासह त्याच्या मित्रांवर गुन्हा दाखल केला.

तसेच या प्रकरणी पोलिस पुत्रानेही त्या विद्यार्थीनीच्या मित्रांविरोधात मारहाण केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. आपण आपल्या भावाला भेटण्यासाठी गेलो होतो, पण अनोळखी आरोपींनी गाडीचे कारण सांगत दमदाटी करत मारहाण केली असे तक्रारीत म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
“मोदीजी आता चीनची वाट लावणार, त्यांचे डोळे तर बघा, लाल लाल झालेत”
बदली झाल्यानंतरही समीर वानखेडेंचा पिच्छा सोडायला तयार नाहीत नवाब मलिक, म्हणाले..
…आणि आयुक्तांना पाहून फुल विक्रेत्या महिलेचा मुलगा म्हणाला, ‘ए आई उठ ना गं, बघ सर आलेत’

ताज्या बातम्या