Share

पराभव झाला तर हिमालयात जाईल म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांची झाली गोची; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

गेल्या काही महिन्यांपासून उत्तर  कोल्हापूरची पोटनिवणूक चर्चेत होती. पोटनिवडणूकीत भाजप विरुद्ध काँग्रेस अशी टक्कर पाहायला मिळत होती. त्यामुळे मतदार संघ कोणाच्या ताब्यात जातो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. असे असताना काँग्रेसच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी या पोटनिवडणूकीत विजय मिळवला आहे.  (chandrakant patil statement before kolhapur election)

जयश्री जाधव यांनी तब्बल १८ हजार ९०१ मताधिक्याने कोल्हापूरात विजय मिळवला आहे. तर भाजपच्या सत्यजित कदमांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यांना या निवडणूकीत ७७ हजार ४२६ मतं मिळाली आहे. पण या निवडणूकीच्या निकालानंतर सगळ्यात जास्त चंद्रकांत पाटील चर्चेत आले आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची या निकालामुळे चांगलीच कोंडी झाली आहे. कारण निवडणूकीपूर्वी २ नोव्हेंबर २०२० रोजी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना ओपन चॅलेंज केले होते. कोल्हापूरमध्ये पराभूत झालो तर हिमालयात निघून जाईल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते.

कोल्हापूरात पळून आल्याचा टोला सातत्याने विरोधक त्यांना लगावत होते. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी हिमालयात जाण्याचं विधान केलं होतं. पुण्यात सुरक्षित म्हणून नव्हे, तर पक्षाने सांगितले म्हणून आलो. माझी कोल्हापूर जिल्ह्यातून विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी होती. पण पक्षाच्या आदेशानुसार मी पुण्यात आलो, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं होतं.

मी कोल्हापूरमधील मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास आजही तयार आहे. आज कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्याही आमदाराने राजीनामा द्यावा. मी तिथून निवडणूक लढेल. मला हरणे माहित नाही. निवडून नाही आलो तर हिमालयात निघून जाईल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते.

भाजपच्या आजच्या पराभवानंतर महाविकास आघाडीने चंद्रकांत पाटलांना त्यांच्या आव्हानाची आठवण करुन दिली आहे. तसेच आता हिमालयात कधी जाणार? असा प्रश्न उपस्थित केला आहे. इतकेच नाही, तर कोल्हापूरमध्ये शिवसेनेने चंद्रकांत पाटील यांचे साधूच्या वेशातील फोटो असलेले बॅनर लावलेले असून त्यात हिमालय की गोद में, असे लिहिलेले आहे.

तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. त्या नेत्यांनी चंद्रकांत पाटलांना ट्विटवर ट्रोल केले आहे. त्यामुळे हिमालयात निघून जाण्याची चंद्रकांत पाटील यांची ही घोषणा त्यांच्या चांगलीच अंगलट आल्याचे दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या-
गोविंदासोबत झळकलेल्या ‘या’ अभिनेत्रीला आता ओळखणंही झालं कठिण; झाली अशी अवस्था
आनंद शिंदेंसाठी नातवाने केली भावूक पोस्ट; म्हणाला, जरी आम्ही एक परिवार असलो तरी त्या क्षणाला..
९० च्या दशकातील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची आता झाली अशी अवस्था; ओळखणेही झालं कठिण

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now