गेल्या काही महिन्यांपासून उत्तर कोल्हापूरची पोटनिवणूक चर्चेत होती. पोटनिवडणूकीत भाजप विरुद्ध काँग्रेस अशी टक्कर पाहायला मिळत होती. त्यामुळे मतदार संघ कोणाच्या ताब्यात जातो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. असे असताना काँग्रेसच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी या पोटनिवडणूकीत विजय मिळवला आहे. (chandrakant patil state president position)
जयश्री जाधव यांनी तब्बल १८ हजार ९०१ मताधिक्याने कोल्हापूरात विजय मिळवला आहे. तर भाजपच्या सत्यजित कदमांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यांना या निवडणूकीत ७७ हजार ४२६ मतं मिळाली आहे. पण या निवडणूकीच्या निकालानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर याचा मोठा परीणाम होण्याची शक्यता आहे.
चंद्रकांत पाटील यांनी गेल्या काही दिवसांपासून पक्षाला अडचणीत आणणारी वक्तव्य केली होती. त्यामुळे त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवण्यात येण्याची शक्यता आहे. कारण कोल्हापूरची पोटनिवडणूक भाजपने चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढवली होती.
या निवडणूकीत नेतृत्व करताना चंद्रकात पाटील यांनी हिंदूत्वाचा मुद्दा पुढे केला होता.असे असतानाही काँग्रेसच्या जयश्री पाटील यांचा या निवडणूकीत विजय झाला आहे. सध्या चंद्रकांत पाटील यांनी निवडणूकीवेळी आणि निवडणूकीच्या आधी केलेली वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कोल्हापूरात पराभव झाला तर राजकारण सोडून हिमालयात निघून जाईल, असे व्यक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. तसेच निवडणूकीच्या काळात नागरिकांच्या खात्यावर पेटीएमद्वारे १ हजार रुपये जरी आले तरी त्याची ईडीकडून चौकशी होऊ शकते, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते.
चंद्रकांत पाटील यांची हीच वक्तव्ये आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पक्षाला अडचणीत आणणाऱ्या या वक्तव्यांमुळे त्यांना प्रदेशाध्यक्षपदावरुन हटवण्यात येण्याची शक्यता आहे. याबाबत पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहे, अशी माहिती समोर येत आहे.
महत्वाच्या बातम्या-
सामूहिक हत्याकांड! 3 मुलींसह कुटुंबातील पाच जणांचा चिरला गळा, थरारक घटनेनं देश हादरला
भर बैठकीत लष्करप्रमुखांनी इम्रान खान यांच्या लावली कानाखाली? वाचा व्हायरल पोस्टमागचे सत्य
पराभव झाला तर हिमालयात जाईल म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांची झाली गोची; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली