Share

राज्यसभा निवडणूकीत भाजपने काँग्रेसचा केला करेक्ट कार्यक्रम, ‘अशी’ केली कोंडी; पहा विजयाचे गणित..

देशातील १५ राज्यांमध्ये राज्यसभेच्या ५७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. अशात याठिकाणी भाजप विरुद्ध विरोधी पक्ष यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. राजस्थान, हरीयाणा, कर्नाटक, आणि महाराष्ट्रात उमेदवारांमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे. (bjp statergy in rajyasabha election)

अशात या ठिकाणीही भाजपने काँग्रेससोबत गेम करत त्यांच्यासमोर एक अडचण उभी केली आहे. ज्या राज्यांमध्ये भाजपला टक्कर मिळणार आहे, तिथे राज्यांमध्ये जिंकलेल्या जागांव्यतिरिक्त भाजपने प्रत्येकी एक उमेदवार उभा करुन आणि पाठिंबा देऊन काँग्रेसच्या अडचणीत वाढ केली आहे.

चार राज्यांमध्ये भाजपने विजयासाठी पूर्ण ताकद लावली आहे. पक्षानं चार केंद्रीय मंत्र्यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. भाजपच्या नेतृत्वाने राजस्थानमध्ये केंद्रीयमंत्री नरेंद्रसिंग तोमर, हरीयाणात गजेंद्रसिंग शेखावत, कर्नाटकात जी किशन रेड्डी आणि महाराष्ट्रात अश्विनी वैष्णव यांची निवडणूक प्रभारी म्हणून निवड केली आहे

हरीयाणात राज्यसभेच्या दोन जागांसाठी निवडणूक होणार आहे. तर त्यामध्ये तीन उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. येथे बहुमताचा आकडा ३१ असा आहे. विधानसभेत भाजपचे ४१ आमदार आहे. अशा स्थितीत भाजपचे उमेदवार अजय मानक सहज विजयी होऊ शकतात. तसेच काँग्रेसकडे ३१ आमदार असून त्यांचे उमेदवार अजय मानक यांचाही विजय होण्याची शक्यता आहे. पण एकी मत इकडे तिकडं गेलं तर अपक्षासोबत काँग्रेसची कडवी लढत होईल.

राजस्थानमध्ये विधानसभेच्या २०० जागा आहे. कोणत्याही उमेदवाराला राज्यसभेत पोहोचण्यासाठी ४१ मतांची गरज आहे. राज्यात काँग्रेसचे १०८ तर भाजपचे ७१ आमदार आहे. काँग्रेसला चारपैकी दोन तर भाजपला एक जागा जिंकता येणार आहे. पण चौथ्या जागेसाठी दोघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे.

कर्नाटकात कोणत्याही उमेदवाराला जिंकण्यासाठी ४५ मतांची आवश्यकता आहे. येथे भाजपचे १२२ आमदार आहे. केंद्रीयमंत्री निर्मला सीतारामन आणि अभिनेता जगेश यांनी विजय मिळल्यानंतर त्यांच्याकडे ३२ मतं शिल्लक राहतील. जी तिसऱ्या उमेदवाराला जातील. काँग्रेसकडे ७० आमदार असून एक उमेदवार विजयी झाल्यानंतर २५ मतं शिल्लक राहतील. त्यामुळे दुसऱ्या उमेदवाराला जिंकण्यासाठी त्यांच्याकडे २० मतं असणं आवश्यक आहे.

महाराष्ट्रातून सहा उमेदवार राज्यसभेत जाणार आहे. त्यांना ४२ मतांची गरज आहे. भाजपने पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आहे. भाजपकडे स्वबळावर दोन उमेदवार जिंकतील इतकी मतं आहे. तर शिवसेनेकडून संजय राऊत, संजय पवार, राष्ट्रवादीकडून प्रफुल पटेल आणि काँग्रेसकडून इम्रान प्रतापगढी यांचा समावेश आहे. तिसऱ्या जागेसाठी भाजपला आणखी ११ आमदारांची गरज आहे, तर शिवसेनेला ३० आमदारांची गरज आहे.

महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्र हादरला! जन्मदात्या आईने पोटच्या मुलांचा केला खून, नंतर जाळली प्रेतं; कारण वाचून हादराल
साकीनाका बलात्कार प्रकरणात आरोपी मौहन चौहानला फाशीच, एक वर्षाच्या आतच लावला निकाल
मांसबंदी झाल्यानंतर मुस्लिम मालकाने बदलले हॉटेलचे नाव, स्टाफ आणि जेवण; म्हणाला, ‘पर्याय नाही’

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now