Thackeray Group: गेल्या काही दिवसांपासून राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे. एकनाथ शिंदे ((Eknath Shinde) यांना शिवसेना (Shivsena)हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे गट (Thackeray Group) लवचिक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या दरम्यान आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी ट्विस्ट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एकनाथ शिंदेंच्या गटाला आव्हान देण्यासाठी आता महाविकास आघाडी सज्ज झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. लवकरच राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांमधील महापालिकेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.
पुढच्या वर्षी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या दालनात महाविकास आघाडी पक्षाची संयुक्त बैठक पार पडली आहे. या बैठकीला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि महाविकास आघाडीचे आमदार देखील उपस्थित होते. यानंतर देखील १५ मार्चला देखील सभेचे आयोजन करण्यात आलं आहे.
यावेळी, आगामी काळात शिंदे-फडणवीस सरकारला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आक्रमक भूमिका मांडण्यासाठी या संयुक्त सभा घेण्यात येणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २ एप्रिल पासून या सभांची सुरुवात छत्रपती संभाजीनगर येथून करण्यात येणार आहे. यादरम्यान, या सभांमध्ये उद्धव ठाकरे, अजित पवार आणि नाना पटोले हे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते मार्गदर्शन करणार आहेत.
त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यात होणाऱ्या या सभांमधून महाविकास आघाडीचे नेते नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष वेधलं आहे. तसेच, या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे, महाविकास आघाडी येत्या काळात संयुक्त सभांच्या माध्यमातून मिंधे सरकारला सळो की पळो करून सोडणार आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याअगोदर औरंगाबादचे नामांतर करण्याचा निर्णय घेतला होता. पण सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकारने याबाबत पुन्हा निर्णय घेतला. महत्त्वाचं म्हणजे केंद्र सरकारने या नामांतराला हिरवा कंदील दिला आहे. पण एमआयएमकडून त्याला कडाडून विरोध करण्यात येत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका मांडणार हे पाहणं सर्वात महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
नागालॅंडमध्ये राष्ट्रवादी भाजपसोबत का गेली? अखेर सुप्रिया सुळेंनी सांगीतले खरे कारण, वाचून धक्का बसेल
शिंदेंनंतर आता राज ठाकरेंनीही साधला डाव; मुंबईत सेनेला भलमोठे भगदाड, ‘या’ नेत्यांचा मनसेत प्रवेश
सतीश कौशिकांच्या अचानक मृत्यूने बॉलीवूड हादरले! मृत्यूमागील खरे कारण आले बाहेर, चालू गाडीतच…






