Share

‘तुमच्या देवाचे बाप आम्ही आहोत’; भाजपने शरद पवारांच्या ‘त्या’ भाषणाचा व्हिडिओ केला ट्विट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. शरद पवार हे नास्तिक आहे, असे राज ठाकरेंनी म्हटले होते. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर देत शरद पवारांचे मंदिरातले अनेक फोटो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व्हायरल केले होते. (bjp share sharad pawar video)

आता भाजपने शरद पवारांचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. महाराष्ट्र भाजपच्या ट्विटर हँडलवरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ शरद पवारांच्या साताऱ्यातील भाषणातला आहे. आता या व्हिडिओमुळे पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

शरद पवार भाषण देत असताना कशाप्रकारे हिंदू देवी देवतांचा अपमान केला आहे, हे यातून दाखवण्यात आले आहे. शरद पवारांनी जवाहर राठोड यांच्या एका कवितेचा या भाषणात उल्लेख केलेला आहे. त्याचाच धागा पकडत भाजपने शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

नास्तिक शरद पवार यांनी हिंदू देवी देवतांचे बाप काढालेत. पवार नेहमीच हिंदू धर्माचा द्वेष करतात. पवारांनी हिंदू धर्माची बदनामी केली नसती, जातीवाद केला नसता, देवीदेवतांचा अपमान केलाच नसता, तर ते एवढे मोठे झालेच नसते. पवार साहेब ह्या वयात आपल्याला शोभेल असेच वक्तव्य करा, असे ट्विट भाजपने केले आहे.

शरद पवारांनी जवाहर राठोडांची एक कविता सांगितली होती. आम्ही आमच्या चिनी हाथोड्यांपासून बनवलेल्या जात्यामुळे आज अनेकांचं पोट भरत आहे. या सोबतच आम्ही अनेक गोष्टी बनवल्या. तुम्ही ज्यांची पुजा करता ते ब्रम्हा, विष्णु, महेश यांच्या मूर्ती आम्ही घडवल्या. त्या तुम्ही मंदिरात ठेवल्या आणि आता आम्हाला मंदिरात येऊ देत नाही. तुमच्या देवाचे बाप आम्ही आहोत. त्यामुळे आमच्यावर झालेला अन्याय आम्ही सहन करणार नाही, अशी जवाहर राठोड यांची कविता पवारांनी म्हटली होती.

शरद पवारांनी सुनावलेल्या या कवितेवरुन भाजप आक्रमक झाला आहे. शरद पवारांनी हिंदू देवी देवतांचा अपमान केला आहे, असे भाजपने म्हटले आहे. त्यामुळे हा वाद आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. तसेच राष्ट्रवादी याला काय उत्तर देणार याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

महत्वाच्या बातम्या-
खिशात नव्हते पैसै, पिना विकून दिले ‘सा रे ग म प’ चे ऑडिशन, आता बदलले आयुष्य; वाचा यशोगाथा
कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी ‘या’ तीन पदार्थांचे सेवन करा, हाडांचा त्रास होणार कमी
राहुल द्रविडचे पुस्तकाच्या दुकानातील फोटो व्हायरल, साधेपणा पाहून चाहते म्हणाले…

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now