दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यात या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. राज्यात सध्या भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. कर्नाटकात पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजप (BJP) पूर्णपणे सक्रिय आहे. राज्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे वारंवार दौरे होत आहेत. दुसरीकडे काँग्रेसही सातत्याने निवडणुकीच्या तयारीत गुंतलेल आहे. यादरम्यान भाजपचे आमदार पुत्तन्ना यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.
गेल्या आठवड्यात कर्नाटकातील भाजप आमदाराच्या मुलाला ४० लाखांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर भाजप आमदार आणि त्यांच्या मुलावर छापा टाकून ८ कोटींहून अधिक रोकड जप्त करण्यात आली. यादरम्यान काँग्रेसने भाजपला आणखी एक मोठा झटका दिल्याने पक्ष अजून अडचणीत सापडला आहे.
भाजपचे आमदार पुत्तन्ना यांनी पक्षाचा राजीनामा दिला असुन काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहेत. पुत्तन्ना हे काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची खात्री आहे. मात्र, पुत्तन्ना यांना काँग्रेसमध्ये आतापासूनच विरोध सुरू झाला आहे. ते बंगळुरू शहरातून निवडणूक लढवणार आहेत. बंगळुरू शहरात २८ जागा आहेत.
पुत्तन्ना यांनी बेंगळुरू अर्बन, बेंगळुरू ग्रामीण आणि जिल्ह्यांतील शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. पुत्तन्ना यांची ऑक्टोबर २०२० मध्ये विधान परिषदेवर पुन्हा निवड झाली आणि त्यांचा कार्यकाळ ऑक्टोबर २०२६ मध्ये संपणार होता. एक दिवसापूर्वी पुत्तन्ना यांनी वैयक्तिक कारणास्तव भाजपच्या एमएलसी आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
पुत्तन्ना यांनी यापूर्वी कर्नाटकातील सत्ताधारी भाजप सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. भाजप सरकारवर आरोप करत पुत्तन्ना म्हणाले की, त्यामुळेच हा निर्णय घ्यावा लागला. जे स्वप्न घेऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला होता ते स्वप्न गुदमरल्यामुळे पूर्ण होऊ शकले नाही. सरकार जनतेचा एकही प्रश्न सोडवत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, कर्नाटकमध्ये २०२३ च्या विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिने उरले आहेत. राज्यात २२४ जागांसाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत आहे. जिथे काँग्रेस माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार आहे. दुसरीकडे, भाजपचे प्रमुख चेहरे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत.
महत्वाच्या बातम्या
मनुस्मृती जाळली, त्यावर पेटवली सिगारेट अन शिजवले चिकन; मुलीचा डॅशिंग व्हिडिओ व्हायरल
शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचा सख्खा भाऊ ईडीच्या ताब्यात; राजकीय वर्तूळात खळबळ
नागालॅंडमध्ये झालं तसंच उद्या महाराष्ट्रातही होणार; भाजप राष्ट्रवादी युतीचा प्लॅन खासदाराने फोडला





