भाजपचे श्रीकांत देशमुख यांनी सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. श्रीकांत देशमुख यांचा एका महिलेबरोबरचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये महिलेने श्रीकांत देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यानंतर एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. (bjp leader shrikant deshmukh resign)
आता पक्षाने श्रीकांत देशमुख यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. पक्षाने श्रीकांत देशमुख यांना तात्काळ राजीनामा देण्याचे निर्देश दिल्याने त्यांनी आपले पद सोडल्याचे बोलले जात आहे. दीड वर्षांपूर्वी श्रीकांत देशमुख यांनी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती.
सोशल मीडियावर एक वादग्रस्त व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर सोलापूरचे भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. दरम्यान, सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा तात्पुरता कार्यभार शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांच्याकडे देण्यात आला आहे.
श्रीकांत देशमुख यांनी दीड वर्षापूर्वी सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. अशात त्यांचा एका महिलेसोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये महिलेने त्यांच्यावर फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती.
काही दिवसांपूर्वी श्रीकांत देशमुख यांनी मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात हनीट्रॅपमध्ये अडकल्याची तक्रार दाखल केली होती. व्हायरल झालेल्या कथित व्हिडिओमध्ये देशमुख बेडरूममध्ये एका महिलेसोबत दिसत आहेत.देशमुख यांच्यासोबत असलेल्या महिलेचे त्यांच्याशी काय नाते आहे, हे कळलेले नाही.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये संबंधित महिला आपल्या मोबाईलचा कॅमेरा देशमुख यांच्याकडे दाखवत आहे. त्यावेळी देशमुख पलंगावर बसले आहेत. तर कॅमेऱ्यासमोर येऊन देशमुख यांचे नाव घेते आणि त्यांच्यावर फसवणूक केल्याचा आरोप करते.
हे ऐकून देशमुखही पलंगावरुन उठतात आणि महिलेचा मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. त्यानंतर कॅमेरा बंद होतो. काही दिवसांपूर्वी देशमुख यांनी त्या महिलेविरुद्ध मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात हनीट्रॅपची तक्रार दाखल केली होती.
महत्वाच्या बातम्या-
मुलाला गिळल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी मगरीसोबत केलं हे भयानक कृत्य, व्हिडिओ आला समोर
ठाकरेंना आव्हान देण्यासाठी संतोष बांगर करत होते शक्तीप्रदर्शन, शिवसैनिकांनी दिला दणका
रात्री झोपताना ‘ही’ चूक करत असताल तर व्हा सावध, शरीरावर होतील गंभीर परिणाम