Share

कर्नाटक पाठोपाठ ‘या’ राज्यातही भाजपचं टेन्शन वाढलं; ४० नाराज आमदारांनी दिल्लीत ठोकला तळ

मणिपूरमधील भाजप ((BJP) सरकारच्या अडचणी वाढत आहेत. येथील एकामागून एक पक्षाच्या आमदारांनी राजीनामे दिल्यानंतर आता आमदारांचा एक गट दिल्लीकडे (Delhi) वळला आहे. येथे हा गट भाजपच्या केंद्रीय नेत्यांना भेटण्यासाठी तळ ठोकून आहे. हे सर्वजण मुख्यमंत्र्यांवर नाराज आहेत.

आमदारांची ही भूमिका पाहता मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्या सरकारमधील मतभेद चव्हाट्यावर येत असल्याचे बोलले जात आहे. पक्षाच्या एका प्रमुख नेत्यानेही सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या शिष्टमंडळामध्ये तब्बल ४० आमदारांचा समावेश आहे.

या सर्व आमदारांना नेतृत्वात मोठा फेरबदल हवा असून त्यांनी मंत्रिमंडळात फेरबदलाचीही मागणी केली आहे. माजी आयपीएस अधिकारी राधेश्याम यांनी नुकताच १४ एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारपदाचा राजीनामा दिला आहे. तर आमदार करम श्याम यांनी मणिपूर पर्यटन महामंडळाच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे.

मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंग यांच्याविरोधात भाजप आमदारांनी आघाडी उघडली आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीबद्दल संतप्त आमदारांनी संबित पात्रा यांच्याकडे तक्रार केल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यातील मुख्यमंत्र्यांवर नाराज असलेल्या दोन आमदारांनी जबाबदारी न दिल्याच्या तक्रारी करत आपापल्या सरकारी पदांचा राजीनामा दिला आहे.

मणिपूर सरकारच्या विविध महामंडळे आणि संस्थांमध्ये अध्यक्षपदाची जबाबदारी असलेले आणखी अनेक आमदार या सरकारी पदांचा राजीनामा देऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने आमदार नाराज असल्याने मोठी चर्चा रंगली आहे. मात्र वरिष्ठांशी बोललो म्हणजे शिस्तभंग नाही, असं या आमदारांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ऐन निवडणुकीच्या तोंडावर कर्नाटकमध्ये राजकीय वर्तुळात मोठी उलाढाल झाली आहे. भाजप नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी तीन दिवसांपूर्वी विधानसभा सदस्य त्याचा राजीनामा दिला आहे. तसेच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे याचा फटका आगामी निवडणुकीत भाजपाला बसणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या
सचिनच्या पोराने वाचवली रोहितची लाज, थरारक गुणत मुंबई हैद्राबादला 14 धावांनी हरवले; ‘हे’ ठरलेचे हिरो
‘मी एकनाथ विजयांचा फन’; ठाकरेंच्या बड्या नेत्याकडून प्रशंसा; ठाकुर गटाला पडणार खिंडार
२ दिल्ली आणि भूतला दोन राजकीय स्फोट होणार”; सुप्रिया सुळेंचा मोठा गौप्य स्फोट

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now