‘आप मेरे बडे भाई है, मुझे शर्म आ रही है, फिर भी हमे १ अब्ज डाॅलर दिजीए’; पाकीस्तानी पंतप्रधांनाचा भीक मागणारा व्हिडिओ व्हायरल

पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचे शेवटचे श्वास सुरू आहेत. आता पाकिस्तान आपल्या आयातीचा खर्चही करू शकत नाही. परिस्थिती इतकी बिकट आहे की पाकिस्तान पैसे वाचवण्यासाठी रात्री बाजार बंद करत आहे, जेणेकरून वीज कमी खर्च होईल. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

हा व्हिडीओ पाहून लक्षात येते की, नुकत्याच झालेल्या UAE दौऱ्यातही त्यांनी कर्ज मागितले होते. शहबाज म्हणाले की, त्यांना लाज वाटते, पण तरीही त्यांनी पैसे मागितले आहेत. शाहबाज शरीफ म्हणाले, ‘मी दोन दिवसांपूर्वी यूएईहून आलो आहे. तेथे मी सदर राज्यप्रमुख आणि माझा भाऊ मोहम्मद बिन झायेद यांना भेटलो.

तो आमच्याशी खूप प्रेमाने वागला. आधी मी ठरवलं होतं की आता त्याच्याकडे जास्त कर्ज मागणार नाही, पण मी शेवटच्या क्षणी ठरवलं आणि त्याच्याकडे आणखी कर्ज मागायचं धाडस केलं. तर मी त्याला म्हणालो कि तू मोठा भाऊ आहेस आणि मला खूप लाज वाटते आहे, पण ही आमची मजबुरी आहे. तुम्हा सर्वांना सगळे माहीत आहे. तर आम्हाला आणखी अब्ज डॉलर द्या.

पाकिस्तानला जेव्हा जेव्हा पैशाची गरज असते तेव्हा तो इस्लामिक राष्ट्र असल्याच्या नावाखाली आखाती देशांसमोर कटोरा घेऊन उभा राहतो. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी गेल्या आठवड्यात यूएईला भेट दिली. येथे त्यांनी उद्योजकांची भेट घेतली आणि पाकिस्तानमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले.

ते म्हणाले की ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि ई-कॉमर्ससाठी पाकिस्तान चांगला आहे. एप्रिल 2022 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर त्यांची ही तिसरी भेट होती. त्यांच्या या भेटीदरम्यान ते कर्ज मागतील अशी अटकळ होती, पण आता त्यांनीच ते मान्य केले आहे.

सोमवारी सकाळपासून पाकिस्तानमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. जवळपास 12 तास झाले आहेत, पण पाकिस्तानच्या बहुतांश भागात अद्याप लाईट आलेली नाही. पाकिस्तानातील कराची, इस्लामाबादसारख्या मोठ्या शहरातही वीज नाही. वीज खंडित होण्यामागे ग्रीड फेल असल्याचे सांगितले जात आहे.

खरे तर पाकिस्तानातील बहुतांश वीज जीवाश्म इंधनापासून बनविली जाते. त्यातील मोठा भाग आयात करावा लागतो. पैसे वाचवण्यासाठी पाकिस्तानने रात्री ८ नंतर बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ऊर्जामंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, हिवाळ्यात मागणी कमी असते, त्यामुळे अनेक प्लांट रात्री बंद असतात. सोमवारी सकाळी ते पुन्हा सुरू केले असता ग्रीडमध्ये बिघाड झाला.

महत्वाच्या बातम्या
राणेंची ठाकरेंवर खालच्या पातळीवर टिका, भुजबळ उठले, गोऱ्हेंचा आक्षेप; विधानभवनात हायहोल्टेज ड्रामा, वाचा नेमकं काय घडलं..
बागेश्वर बाबा महिन्यालाच करतात लाखोंची कमाई; आकडा वाचून चक्रावून जाल 
सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड पुन्हा उतरणार आखाड्यात, ‘या’ दिवशी रंगणार सामना