महाराष्ट्र केसरी स्पर्धेनंतर दोन पैलवान खुप चर्चेत आले ते म्हणजे, महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत या दोघांमध्ये अंतिम लढत झाली होती ज्यामध्ये महेंद्र गायकवाड याचा विजय झाला होता. त्यानंतर सिकंदर शेखवर अन्याय झाला आहे असा आरोप त्याचे चाहते करत होते.
सिकंदर गायकवाडनेही नंतर यावर स्पष्टीकरण देत आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगितले होते. पंचानी चुकीचा निर्णय दिला असे त्याचे म्हणणे होते. पंचाच्या निर्णयावर चाहते खुप संतापले होते. त्यानंतर सिकंदर शेख खुप चर्चेत आला आहे. आता पुन्हा या दोन पैलवानांची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे.
भीमा सहकारी साखर कारखान्याने आयोजित केलेल्या भीमाकेसरीच्या मातीत हे पुन्हा भिडताना दिसणार आहेत. दोघेही पंजाबमधील पैलवानांशी झुंजताना दिसणार आहेत. खासदार धनंजय महाडिक यांचा वाढदिवस आहे. या निमित्ताने भीमा सहकारी कारखान्याच्या वतीने भीमा केसरी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
टाकळी सिकंदर येथील कारखान्याच्या मैदानावर मोठा आराखडा तयार करण्यात आला असून पाच हजार प्रेक्षक एकाच वेळी सामने पाहू शकतील अशी व्यवस्था केली गेली आहे. कारखान्याचे अध्यक्ष विश्वजित महाडिक यांनी ही माहिती दिली आहे.
राज्यातील ४०० पेक्षा जास्त पैलवानांनी रेजिस्ट्रेशन केलं आहे पण यामध्ये पाच कुस्त्या ह्या महत्वाच्या असणार आहेत. या कुस्त्यांमध्ये ९ लाखांची बक्षिसे आणि चांदीच्या गदा देण्यात येणार आहेत. भीमा केसरी साठी सिकंदर शेख आणि पंजाब केसरी भूपेंद्रसिंह अजनाला यांच्यात लढत होणार आहे जी पाहण्यासारखी होणार आहे.
गेले दोन तीन वर्षे कोरोनाचा काळ होता. या काळात भीमा सहकारी कारखान्यावरील या मानाच्या कुस्त्या झाल्याच नाहीत. त्यामुळे २४ जानेवारीला या कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. अवघ्या महाराष्ट्राचे या कुस्त्यांकडे लक्ष असणार आहे. पुर्ण देशातील मल्ल या स्पर्धेत भाग घेण्यासाठी येणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
आंबेडकर सोबत येताच ठाकरे आक्रमक! काँग्रेस-राष्ट्रवादीला दिला थेट इशारा; वाचा नेमकं काय म्हणाले?
सूर्या, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर महाकालेश्वरच्या दर्शनाला; पंतच्या प्रकृतीसाठी घातले साकडे
‘ही’ आहे जगातील सर्वात महागडी गणेशमूर्ती, किंमत आहे 500 कोटींहून अधिक; वाचा खास वैशिष्टे
‘ही’ आहे जगातील सर्वात महागडी गणेशमूर्ती, किंमत आहे 500 कोटींहून अधिक; वाचा खास वैशिष्टे