सोमवारी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्रांचे अनावरण झाले. हा कार्यक्रम विधानभवनात पार पडला आहे. या कार्यक्रमात अनेक नेत्यांनी भाषणे केली. त्यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही भाषण केले आहे. पण त्यांच्या भाषणामुळे वाद निर्माण झाला आहे.
भाषणात बोलत असताना बाळासाहेब यांना मानसिक त्रास दिला गेल्याचे नारायण राणे यांनी म्हटले. त्यांना कोणी मानसिक त्रास दिला याबाबतही नारायण राणे बोलत होते. बाळासाहेब सर्वांना वडीलांसारखे होते. पण कितीजण मुलासारखे वागले, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे टीका केली. त्यामुळे नारायण राणेंच्या त्या भाषणावर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आक्षेप घेतला आहे.
नारायण राणे यांनी जे भाषण केलं ते औचित्यभंगाचं भाषण असल्याचे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे. नारायण राणे यांचं भाषण सुरु असताना छगन भुजबळ उठून बाहेर जात होते तर राणेंनी त्यांना अडवलं होतं. त्यावेळी भुजबळांनी त्यांना हात दाखवला. तो हात समर्थनाचा होता, असे राणेंनी म्हटले आहे.
नारायण राणेंच्या या भाषणावर टीका होत असताना नीलम गोऱ्हे यांनी सुद्धा यावर आक्षेप घेतला. त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना भाषण थांबवायला सांगितले. त्यावर नारायण राणेंनी त्यांच्यावर पलटवार केला. ते म्हणाले की, मी बसून बोलणाऱ्यांचं ऐकत नसतो.
तसेच नीलम गोऱ्हे यांनी विधानसभेत आणखी एक आक्षेप घेतला. या कार्यक्रमात बाळासाहेबांचे तैलचित्र दाखवण्यात आलं नसल्याबद्दल त्यांनी आक्षेप घेतला आहे. आक्षेप घेत असताना त्यांनी राहूल नार्वेकर यांच्यावरही निशाणा साधला आहे.
राहूल नार्वेकर यांचं अभिनंदन. ते सुद्धा आधी शिवसेनेत होते. त्यांनी अजूनही आम्हाला तैलचित्र दाखवलेलं नाही. पण हरकत नाही. वारीला जाणारा वारकरी विठ्ठलाचा झेंडा कोणाच्या हातात आहे हे पाहून जात नाही. तसे आम्ही सर्वकाही बाजूला ठेवून इथे आलो आहे, असे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड पुन्हा उतरणार आखाड्यात, ‘या’ दिवशी रंगणार सामना
आंबेडकर सोबत येताच ठाकरे आक्रमक! काँग्रेस-राष्ट्रवादीला दिला थेट इशारा; वाचा नेमकं काय म्हणाले?
अनोखा मॉल! इथे गरीबांना मोफत मिळतात स्वेटर, ब्लँकेट आणि बूट; पण ‘या’ एकमेव अटीवर