छत्तीसगडच्या रायपूरमधील बागेश्वर बाबा सध्या संपुर्ण देशात चर्चेचा विषय ठरले आहे. त्यांच्या दरबारात आलेल्या लोकांनी समस्या सांगण्याआधीच ते लोकांच्या समस्या जाणून घेत आहे, अशा चर्चा आहे. पण त्यांच्यावर अंधश्रद्धा पसरवण्याचे आरोप होत आहे.
बागेश्वर बाबा यांचे खरे नाव धीरेंद्र कृष्ण शास्त्री असे आहे. गेल्या आठवड्यात त्यांचा नागपूरमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यांच्या या कार्यक्रमावर अंनिसकडून आक्षेप घेण्यात आला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यांना शक्ती जाहीरपणे सिद्ध करण्याचं आव्हान दिलं.
बागेश्वर बाबा यांच्याविरोधात अनेकजण आक्रमक झाले आहे. देशात बागेश्वर बाबांच्या विरोधात आणि समर्थनार्थ लोक विधाने करत आहे. तसेच जे लोक त्यांच्यावर टीका करत आहे, त्यांना बागेश्वर बाबा पत्रकार परिषद घेऊन सर्वांसमोर उत्तर देत आहे.
बागेश्वर बाबा हे चर्चेत आल्यामुळे त्यांच्याबाबत अनेक प्रश्न लोकांना पडले आहे. त्यातलाच एक प्रश्न म्हणजे बागेश्वर बाबा यांच्याकडे संपत्ती किती आहे. जेव्हा ते कार्यक्रम घेतात तेव्हा लोकांची गर्दी एवढी का जमते आणि ते कोणता चमत्कार करुन दाखवतात? आता तेच तुम्हाला सांगणार आहोत.
धीरेंद्र शास्त्री यांचा जन्म ४ जुलै १९९६ रोजी मध्य प्रदेशातील छतपूर जवळ असलेल्या गडाजंग गावात झाला. ते एका गरीब कुटुंबात जन्माला आले होते. एकेकाळी त्यांच्या घरात खायला अन्न सुद्धा नव्हते. त्यांचे कुटुंब अजूनही तिथेच राहते. त्यांचे आजोबा भगवानदास गर्ग हे सुद्धा तिथेच राहतात.
मिळालेल्या माहितीनुसार, धीरेंद्र शास्त्री हे महिन्याला ३.५ लाख रुपयांची कमाई करतात. त्यांची रोजची कमाई ही १० ते ११ हजार रुपये आहे. सध्या त्यांच्या अंधश्रद्धा पसरवत असल्याचे आरोप होत आहे. पण ते सर्व आरोप धीरेंद्र शास्त्री यांनी फेटाळून लावले आहे. त्यांच्यावर नागपूरमध्ये गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे.
नागपूरच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी जर कारवाई केली नाही, तर न्यायालयात धाव घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीने बागेश्वर बाबांना एक आव्हानही दिले आहे. ते म्हणाले की, तुम्ही दिव्यशक्ती सिद्ध केली तर तुम्हाला ३० लाखांचं बक्षीस देऊ.
महत्वाच्या बातम्या-
कोणाची सेक्स टेप व्हायरल, तर कोणावर लैंगिक शोषणाचे आरोप; भारतातील बाबांचे ‘हे’ आहेत कारनामे
राणेंची ठाकरेंवर खालच्या पातळीवर टिका, भुजबळ उठले, गोऱ्हेंचा आक्षेप; विधानभवनात हायहोल्टेज ड्रामा, वाचा नेमकं काय घडलं..
जमिनीवर स्वत:चा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी तुम्ही ‘या’ सात पुराव्यांचा करु शकतात वापर; वाचा सविस्तर…