भारतासह अनेक देशांमध्ये सध्या भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा चर्चेचा विषय ठरल्या आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ज्ञानवापी मशिदीच्या वादावर चर्चा सुरू होती. या चर्चेदरम्यान नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
त्या वक्तव्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. हा मुद्दा इतका पेटला आहे की जागतिक पातळीवर पोहोचला आहे. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यानंतर अनेक मुस्लिम देशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अनेक देशांनी भाजपासोबत भारताच्या विरोधात भूमिका घेतली आहे.
भारतीय उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची त्यांची तयारी सुरू आहे. कुवेतमध्ये पंतप्रधान मोदींचे फोटो कचराकुंडीवर लावून निषेध नोंदवला जात आहे. पण भाजप प्रवक्या नुपूर शर्मा यांच्या या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे पुर्ण देशाचा नुकसान झेलावे लागणार आहे हे तर नक्की. पण यामध्ये सर्वात जास्त हाल जर कोणाचे होत असतील तर ते शेतकऱ्यांचे आहेत.
भाजपचे बडतर्फ दिल्ली मिडिया प्रमुख नवीन जिंदाल यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे अरब राष्ट्रांनी भारताच्या विरोधात उघड भूमिका घेतली आहे. या देशांशी भारताचे गेल्या अनेक वर्षांपासून चांगले व्यापारी संबंध आहेत. या वादामुळे हा व्यापार अडचणीत आला आहे.
भारतातील उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचं आवाहन या देशांमध्ये केलं जात असून भारताला मोठ्या प्रमाणावर नुकसान झेलावं लागणार आहे. आखातातील देशांमध्ये शेती फारशी होत नाही कारण तेथे पाण्याची कमतरता आहे. त्यांना ८५ टक्के अन्न आणि ९३ टक्के धान्य बाहेरच्या देशांतून आयात करावं लागतं.
भारताचा यामध्ये खुप मोठा वाटा आहे. भारत या अरब देशांना भाजीपाला, म्हशीचे मांस, तांदूळ, सागरी उत्पादनं, फळं आणि साखर पाठवतो. फक्त युएईबरोबर भारताचा ७२.९ बिलियन डॉलरचा व्यापार आहे. तो २०२६ पर्यंत १०० बिलियन डॉलर्सपर्यंत जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात होती. पण आता झालेल्या या गोंधळामुळे हा व्यापार विसकटण्याची चिन्हे दिसत आहेत.
दरम्यान, रशियामुळे जगभरातील गव्हाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. याचे सर्वात मोठे कारण आहे रशिया युक्रेन युद्ध. युक्रेनमधून गहू, सुर्यफुल, तेल आणि इतर शेतमालाची मोठ्या प्रमाणावर निर्यात होते. पण रशियाशी युद्ध झाल्यामुळे युक्रेनमधील निर्यात मंदावली आहे. यामुळे गव्हाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
आईच्या अपमानाचा कोवळ्या मुलांनी घेतला बदला! उद्योजकावर कोयत्याने वार करत केली हत्या
भाजपने पुन्हा केला पंकजा मुंडेंचा करेक्ट कार्यक्रम; ‘या’ नवीन चेहऱ्यांना दिली संधी, वाचा यादी
७५ किमीचा अमरावती ते अकोला महामार्ग बनवला फक्त ५ दिवसांत, महाराष्ट्राच्या विक्रमाची गिनीज बुकात नोंद
‘या’ कारणासाठी भाजपने अरब राष्ट्रांचे आभार मानले पाहीजेत; अभिनेत्री स्वरा भास्करचा सल्ला