bcci selected bumrah in odi team | नववर्ष सुरु होताच भारतीय संघासाठी आणि क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. संघाचा सामना विजेता खेळाडू जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे बराच काळ बाहेर होता. तो आता पुन्हा भारतीय संघात परतणार आहे.
बीसीसीआयने भारत श्रीलंका यांच्यात होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत त्याची भारतीय संघात निवड केली आहे. म्हणजेच १० जानेवारीपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत बुमराह भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना दिसणार आहे.
बुमराह आयपीएलपर्यंत दुरुस्त होऊन तो थेट आता आयपीएल खेळेल असे म्हटले जात होते. असे असतानाच बुमराहला अचानक श्रीलंका दौऱ्यासाठी संघात निवडण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला. याचे कारणही आता समोर आले आहे.
सध्या टीम इंडियाचा सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आशिया चषकापूर्वीपासून संघाबाहेर आहे. आशिया चषकानंतर त्याचे संघात पुनरागमनही झाले, मात्र केवळ दोनच सामने खेळल्यानंतर पुन्हा त्याच्या पाठीचे दुखणे वाढले. त्यामुळे त्याला संघाबाहेर व्हावे लागले. टी २० वर्ल्ड खेळण्याची संधीही त्याला मिळाली नाही.
अशात राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्याची फिटनेस चाचणी झाली आहे. ती चाचणी तो उत्तीर्ण झाल्यापासून त्याचे भारतीय संघात पुनरागन होईल, अशी चर्चा होती. पण तो आयपीएलमध्येच आता दिसून असे म्हटले जात होते. पण बीसीसीआयने त्याची अचानक श्रीलंकेच्या दौऱ्यावर निवड केली आहे.
२०२२ हे वर्ष टीम इंडियासाठी खूप वाईट होते. आशिया कपमधील पराभवानंतर टी २० वर्ल्डकपमध्येही सेमी फायनलमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या खराब कामगिरीनंतर बोर्ड आगामी २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाबाबत चिंतेत आहे.
अशा परिस्थितीत विश्वचषकाच्या तयारीसाठी जसप्रीत बुमराहचे संघात पुनरागमन करण्यात आले आहे. त्याच्या पुनरागमनानंतर, बुमराह काही सामन्यांमध्ये आपली तंदुरुस्ती सिद्ध करताना दिसणार आहे. विश्वचषकापूर्वी तो या सामन्यांद्वारे आपला जुना फॉर्म परत मिळवण्याचा प्रयत्न करेल.
टीम इंडियाचा श्रीलंकेविरुद्धचा एकदिवसीय संघ-
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.
महत्वाच्या बातम्या-
13 लाख कोटींची कंपनी, 96 लाख पगार; महिलांवर लघुशंका करताना लाज वाटली पाहीजे मिश्रा
बाबा वेंगाची ‘ती’ भयंकर भविष्यवाणी ठरली खरी, सूर्याच्या पृष्ठभागावर स्फोट, पृथ्वीला मोठा धोका?
pune : हिंदुंची हॉटेल चालवण्याची लायकी आहे का? पुण्यात कोयता गँगकडून हॉटेलची तोडफोड





