koyta gang nisha hotel in pune | गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोयता गँग दहशत पसरवताना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी दोन तरुण सिंहगड लॉ कॉलेजजवळ कोयता हातात घेऊन लोकांमध्ये दहशत निर्माण करत होते. पण पोलिसांनी त्यांना पकडून खुप मारहाण केली होती.
आता पुन्हा एकदा काही कोयता गँगचे तरुण हातात कोयता घेऊन फिरत आहे. पोलिसांनी इतकं मारुनही कोयता गँग पुन्हा दहशत पसरवण्याचे काम करत आहे. याचा एक व्हिडिओ आता समोर आला असून त्यामध्ये ५-६ जण टोळी घेऊन हॉटेलची तोडफोड करताना दिसून येत आहे.
पुणे शहरातील भवानी पेठेत हा सर्व प्रकार घडला आहे. तुमची हिंदुची हॉटेल चालवण्याची लायकी आहे का? असा सवाल करत कोयता गँगकडून निशा हॉटेलची तोडफोड करण्यात आली आहे. याप्रकरणी ६ अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निशा हॉटेलचे मालक मोनिष म्हेत्रे असून त्यांनी ही तक्रार दाखल केली आहे. मोनिष म्हेत्रे हे त्यांच्या कुटुंबासोबत भवानी पेठेत राहतात. ते जिथे राहतात त्या बिल्डिंग खालीच त्यांचे निशा रेस्टॉरंट आहे. हे हॉटेल रात्री उशिरापर्यंत सुरु असतं, कारण ग्राहक येत असतात.
५ जानेवारीला दुपारी साडेतीनच्या सुमारास हा सर्वप्रकार घडला. त्यावेळी हॉटेलमध्ये गर्दी कमी होती. संतोष आणि अझीम नावाचे वेटर हॉटेलमध्ये काम करत होते. त्यावेळी अचानक ५-६ तरुण अचानक हॉटेलमध्ये घुसले. त्यांनी तोंडाला रुमान बांधलेला होता.
तसेच त्यांच्या हातामध्ये कोयता, हॉकी स्टिक, लोखंडी रॉड होते. दुचाकीवर आलेल्या या तरुणांनी हॉटेलमध्ये घुसून तोडफोड केली. त्यावेळी हॉटेल मालक हे हॉटेलच्या बाहेर बसलेले होते. तिथे जाऊन त्यांना तरुणांनी शिवीगाळ केली. हिंदुची हॉटेल चालवण्याची तुमची औकात आहे का? असा सवालही विचारला. त्यानंतर तिथून ते निघून गेले. आता त्या तरुणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे.
महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्रातील ‘या’ गावात शेतजमिनीला बांधच नाहीत, तब्बल ९५ हजार एकर जमीन बिनाबांधाची
kolhapur : देवालाही सोडलं नाही! ज्योतिबाची ४०० एकर जमीनच विकली, कोल्हापूरच्या राजकीय नेत्यांचा निर्लज्जपणा
रितेशच्या वेड चित्रपटातून ‘या’ बालकलाकाराने लावलंय प्रेक्षकांना वेड; तिची आई सुद्धा आहे प्रसिद्ध…