Share

भाजपचे उमेदवार जिंकण्यामागं होतं ‘हे’ कारण, अतुल भातखळकरांनी सांगितलं गणित

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठीचे पहिल्या टप्प्याचे निकाल जाहीर झाले असून भाजपने यावेळीही बाजी मारली आहे असे चित्र दिसत आहे. हाती लागलेल्या निकालानुसार राम शिंदे, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, प्रवीण दरेकर यांचा दणदणीत विजय झाला आहे.

विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये राम शिंदे यांना ३० मते मिळाली आहेत, श्रीकांत भारतीय यांना ३० मते मिळाली आहेत तर दरेकरांना २९ मते मिळाली आहेत. उमा खापरे यांना अनुक्रमे २७ मते मिळाली आहेत. पाचवे उमेदवार होते प्रसाद लाड. त्यांनाही १७ मते मिळाली आहेत. आता हे स्पष्ट झालं आहे की भाजपला २८५ पैकी १३३ मतं मिळाली आहेत.

तिन्ही पक्षांची पहिल्या पसंतीची मतं त्यांना मिळाली नाहीत हे यावरून दिसत आहे. काँग्रेसचे दोन्ही उमेदवार पहिल्या फेरीत म्हणावी तशी कामगिरी करू शकले नाहीत. तिन्ही पक्षातील पहिल्या पसंतीची मतं फुटली यात शंका नाही. काँग्रेसचे दोन उमेदवार आणि प्रसाद लाड यांची मतमोजणी दुसऱ्या फेरीत होणार आहे. पण दुसऱ्या फेरीत प्रसाद लाड जिंकतील का?

याबाबत अतुल भातखळकर यांनी समिकरण सांगितले आहे. ते म्हणाले की, पहिल्यांदा राम शिंदे किंवा श्रीकांत भारतीय यांची पहिल्या पसंतीच्या मतांमुळे दुसऱ्या पसंतीची मतं मोजली जाणार आहेत. काँग्रेसला एकही उमेदवार पहिल्या फेरीत जिंकवता आला नाही. प्रवीण दरेकरांच्या दुसऱ्या पसंतीची मतं मोजल्यानंतर शिवसेनेच्या दोन आणि राष्ट्रवादीच्या एका उमेदवाराचा विजय झाला आहे.

या निवडणुकीत भाजपाचे पाचही उमेदवार जिंकल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. कारण या निवडणुकीत भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांच्यातच लढत झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र भाई जगताप यांना पराभवाचा सामना करावा लागल्याने काँग्रेसला धक्का बसला आहे.

तर दुसरीकडे काँग्रसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना पहिल्या पसंतीची २२ मते, तर भाई जगताप यांना १९ मते मिळाली आहेत. काँग्रेसकडे एकूण ४४ मते असून देखील दोघांच्या मतांची बेरीज कमी भरत आहे. भाजपाचे उमेदवार प्रसाद लाड यांना पहिल्या पसंतीची १७ मतं मिळाली आहेत.

महत्वाच्या बातम्या
विधान परिषद! भाजपच्या ‘प्लॅन’वर फिरले पाणी! पहिला निकाल आला; एकनाथ खडसे विजयी
तुला गमावण्याचे दु:ख १०० वेळा सहन करीन पण.., फादर्स डे दिवशी केकेच्या मुलीने केली भावनिक पोस्ट
प्रमाणापेक्षा छोटी मोमोकिनी घालून अनुष्का सायकलवर करत होती ‘हे’ चाळे, विराटने काढला व्हिडीओ
शेवटच्या क्षणी फडणवीसांनी पत्ता टाकला; लाडांना केले सेफ, अन् खापरे “डेंजर’ झोनमध्ये?

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now