Share

उत्तराखंडमध्ये भाजपचा काँग्रेसला मोठा धक्का, भाजप ३६ जागांसह आघाडीवर तर काँग्रेसला २८ जागा

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमधील निवडणुकीचा गोंधळ संपला आहे. पुढील पाच वर्षांसाठी जनतेने कोणत्या पक्षाला आपले आशीर्वाद दिले, पुढील पाच वर्षांसाठी आपले धोरणकर्ते कोणाला निवडून दिले, या निर्णयाची वेळ आली आहे. (assembly election in uttarakhand bjp)

पाचही राज्यांमध्ये आज मतमोजणी होत आहे. यासाठी निवडणूक आयोगाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मतमोजणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात मतमोजणी केंद्र सुरू करण्यात आले आहे.

उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत पोस्टल मतपत्रिकांची मोजणी सुरू झाली आहे. पोस्टल बॅलेटची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर ईव्हीएममधून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.उत्तराखंडमध्ये १४ फेब्रुवारी रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडले, त्यानंतर नशीब आजमावणाऱ्या ६३२ उमेदवारांचे भवितव्य राज्याच्या राजकीय क्षेत्रात आज निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत.

उत्तराखंडमध्ये भाजप सध्य आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.भाजप ३६ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस २८ जागांवर आहे. तर आप आणि इतर पक्षाला प्रत्येकी १-१ जागा मिळाली आहे. अशात पौडीमध्ये काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आणि मुख्य निवडणूक प्रतिनिधी अद्वैत बहुगुणा यांनी पोस्टल बॅलेटमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप केला आहे.

राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीशिवाय पोस्टल मतपत्रिका मतमोजणीच्या ठिकाणी आणण्यात आल्या. अशा स्थितीत मतपत्रिका कुठून आणल्या यावर विश्वास कसा ठेवायचा? असा सवाल अद्वैक बहुगुणा यांनी उपस्थित केला आहे. तसेच मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार मानेल जाणारे हरीश रावत म्हणाले की, कृष्णाची काँग्रेसवर कृपा असून यंदा काँग्रेसचीच सरकार येणार.

महत्वाच्या बातम्या-
उत्तर प्रदेशमध्ये सपाची जोरदार मुसंडी; सुरवातीच्या आघाडीनंतर भाजपच्या जागा कमी व्हायला सुरवात
पंजाबमध्ये आपची जोरदार घोडदौड; कॉंग्रेसची मात्र पिछेहाट
मिस युनिव्हर्स स्पर्धेत इंग्रजी बोलताना अडखळली होती सुष्मिता सेन, पण ‘या’ उत्तराने जिंकले विजेतेपद

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now