Share

‘…तर मी सुद्धा नावाचा गुलाबराव नाही’, ठाकरेंची सभा संपताच गुलाबराव पाटलांनी दिले थेट ‘हे’ आव्हान

Gulabrao Patil

रविवारी (दि. २३)जळगावच्या पाचोर्‍यामध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. या सभेला राजकीय वर्तुळातून कडाडून विरोध करण्यात आला. पण तरीही उद्धव ठाकरे डगमगले नाहीत. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक टीका केली.

यादरम्यान खासदार संजय राऊत आणि गुलाबराव पाटील (Gulabrao Patal) पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. “दगड मारून सभा बंद करणारे आम्ही आहोत. आमच्या नादी लागू नका.” असं म्हणत सभा होण्यापूर्वीच गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना इशारा दिला होता.

त्यानंतर, कुणी उंदीर घुसलाय का आम्ही बघत होतो, असं म्हणत संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांना टोला लगावला आहे. यादरम्यान संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांचा उल्लेख ‘गुलबो गॅंग’ असाही केला होता. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला गुलाबराव पाटील यांनी सडेतोड प्रतिउत्तर दिला आहे.

गुलाबराव पाटील म्हणाले, मी जे सांगितलं होतं तेच सभेत बोललं गेलं, त्या व्यतिरिक्त एकही शब्द बोलला गेला नाही. राऊत काय बोलतात आपल्याला माहितच आहे. त्यांनी फक्त गुलबो गॅंग म्हटल आणि खाली बसले. उद्धव ठाकरे साहेब यांच्याबाबत आमच्या मनात कोणताही राग नाही. पण ज्या माणसाने शिवसेना फोडली त्यांच्याबद्दल आमच्या मनात राग आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

तसेच, मला वाटतं, त्या माणसांच्या कानात सांगितलं असेल की शांत रहा. त्यामुळे संजय राऊतांनी अवघ्या तीन मिनिटात त्यांचं भाषण संपवला. आमचा राजीनामा तयार ठेवा, हे ते सांगणारे कोण? ही तर आमच्या मतांवर मोठी झालेली लोक आहे, असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.

आम्ही म्हणतो की, आमची ४१ मत घेतली त्यांनीच राजीनामा द्यायला हवा. स्वतः राजीनामा द्यायचा नाही आणि हलकटपणे वागायचं. राजीनामा देण्याची संजय राऊतांची लायकी नाही आणि ते देऊही शकणार नाहीत, अशी खोचक टीका गुलाबराव पाटीलांनी केली. तसेच, हिम्मत असेल तर संजय राऊत यांनी जळगाव ग्रामीणमध्ये निवडणूक लढवून दाखवावी, असे थेट आव्हान गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांना दिले आहे.

महत्वाच्या बातम्या
…तोपर्यंत एकनाथ शिंदें यांचं मुख्यमंत्रीपद जाणार; अजितदादांनी केला मोठा गौप्यस्फोट     
‘महाविकास आघाडी आज आहे, उद्याचं माहीत नाही, कारण…’; शरद पवारांनी टाकला राजकीय बॉम्ब 
अजितदादांचे बंड थांबताच राष्ट्रवादीत उभी फूट; ‘या’ मोठ्या नेत्याने पक्षाविरोधात पुकारले बंड

 

 

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now