Share

दिपक हुड्डा बाद होताच आनंदाने नाचू लागला सुर्या; साऊदीसोबत आनंद साजरा करतानाचा व्हिडीओ व्हायरल

न्यूझीलंड विरुद्ध भारत (India) यांच्यातील दुसऱ्या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने यजमानांसमोर विजयासाठी १९२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताला ही धावसंख्या गाठण्यात मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादवचा सर्वात मोठा वाटा आहे.

अवघ्या ५१ चेंडूत १११ धावांची नाबाद खेळी करून सुर्यकुमार पॅव्हेलियनमध्ये परतला. भारतीय खेळीदरम्यान, त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो न्यूझीलंडच्या खेळाडूंसोबत आनंद साजरा करताना दिसला.

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी २० सामन्यात भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने जोरदार फलंदाजी केली‌. तो१११ धावांची नाबाद इनिंग खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याच्या या एकमेव खेळीमुळे टीम इंडियाला यजमान संघासमोर विजयासाठी १९२ धावांचे लक्ष्य ठेवण्यात यश आले.

https://twitter.com/binu02476472/status/1594252651503312898?t=Q2KK_0ZIfEWoPHnIDzSslw&s=19

सूर्यकुमार यादवच्या खेळीदरम्यान, एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दीपक हुडाची विकेट पडल्यानंतर सूर्या यजमान संघाचा गोलंदाज टिम साऊदीशी हस्तांदोलन करताना दिसत आहे. भारतीय डावातील शेवटच्या षटकातील चौथ्या चेंडूवर टिम साऊदीने दीपक हुड्डाला पायांच्या मध्ये फेकला. तो चेंडू मारण्यात खेळाडू अपयशी ठरला.

त्यावेळी दीपक हुड्डाची विकेट पडल्यावर किवी खेळाडू आनंद साजरा करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे फलंदाज सूर्यकुमार यादव गोलंदाज टीम साऊदीशी हस्तांदोलन करताना आनंदी दिसत आहेत. तसेच, सौदीने या षटकात आपली हॅटट्रिक पूर्ण केली. तर दीपक हुड्डा त्याचा दुसरा बळी ठरला. हुड्डाशिवाय साऊदीने त्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर हार्दिक पांड्याला आणि पाचव्या चेंडूवर वॉशिंग्टन सुंदरला बाद केले.

महत्वाच्या बातम्या –

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now