दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी महापालिका निवडणुका पुढे ढकलल्याबद्दल भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच यावेळी त्यांनी एक मोठे व्यक्तव्यही केले आहे. केजरीवाल म्हणाले की, हिंमत असेल तर भाजपने दिल्लीच्या निवडणुका वेळेवर घेतल्या आणि त्या जिंकल्या आम आदमी पक्ष राजकारण सोडेल. (arvind kejriwal on election)
केंद्रीय मंत्रिमंडळाने दिल्ली, उत्तर, पूर्व आणि दक्षिण या तिन्ही नागरी संस्थांना पूर्वीप्रमाणे एकत्र आणण्यासाठी विधेयक मंजूर केल्यानंतर केजरीवाल यांनी ही टीका केली. केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेबाहेर पत्रकारांना सांगितले की, जर भाजपने वेळेवर एमसीडी निवडणुका घेतल्या आणि त्या जिंकल्या, तर आम आदमी पार्टी राजकारण सोडेल.
त्यांनी ट्विट केले की, भाजप स्वतःला जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणवतो. अप्रतिम. जगातील सर्वात मोठा पक्ष घाबरून छोट्या आम आदमी पक्षापासून पळून गेला? हिंमत असेल तर एमसीडीच्या निवडणुका वेळेवर करुन दाखवा. निवडणुका पुढे ढकलणे हा ‘शहीदांचा अपमान’ असल्याचे ते म्हणाले आहे.
केजरीवाल यांनी ट्विट केले की, भाजपने दिल्ली महापालिका निवडणूक पुढे ढकलणे हा त्या हुतात्म्यांचा अपमान आहे, ज्यांनी ब्रिटीशांना देशातून हाकलून देशात लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी बलिदान दिले. आज ते पराभवाच्या भीतीने दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुका पुढे ढकलत आहेत, उद्या ते राज्यांच्या आणि देशाच्या निवडणुका पुढे ढकलतील.
भाजपवर निशाणा साधत अरविंद केजरीवाल म्हणाले की, आज तीन महापालिका एकत्र करायच्या आहेत, म्हणून आम्ही निवडणुका पुढे ढकलत आहोत, असे ते म्हणताय या आधारावर निवडणुका पुढे ढकलता येतील का? उद्या गुजरातमध्ये निवडणुका आहेत आणि ते केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहतील की आम्ही गुजरात आणि महाराष्ट्रच्या निवडणूका एकत्र करणार आहोत, त्यामुळे गुजरातमध्ये निवडणुका घेऊ नका. हे चालेल का?
तसेच पुढच्या वेळी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्यात भारतीय जनता पक्षाचा पराभव होणार असेल. तेव्हा आम्ही संसदीय व्यवस्था रद्द करून अध्यक्षीय पद्धत आणणार आहोत, निवडणुका घेऊ नका, असे पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला भाजप देईल, असेही अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘शूटिंगला बोलावून किडनी विकतील’, ‘झुंड’ फेम बाबूचा किस्सा ऐकून थांबणार नाही हसू
‘आई बनणं नव्हतं शक्य’ गरोदर राहण्यापूर्वी सोनम कपूर करत होती ‘या’ गंभीर आजाराचा सामना
स्वरा भास्करसोबत कॅब चालकाचं विचित्र कृत्य, अभिनेत्रीनं ट्विट करत सांगितला धक्कादायक घटनाक्रम