रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गोळी लागून कर्नाटकच्या नवीनच्या मृत्यूनंतर आता बर्नालाच्या जिंदाल कुटुंबावरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जिंदाल कुटुंबातील एकुलता एक मुलगा चंदन (chandan jindal) याचा ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू झाला आहे. असे नाही की त्याला युक्रेनमध्ये उपचार मिळाले नाहीत. (another indian student died in ukraine and russia war)
त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली पण त्यानंतर तो कोमात गेल्याने २ मार्च रोजी त्याचा मृत्यू झाला. युक्रेनमधील युद्धात भारतीयाचा हा दुसरा मृत्यू आहे. या दुसऱ्या मृत्युनंतर भारताला मोठा धक्का बसला आहे.
बरनाला येथे राहणाऱ्या जिंदाल कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या युद्धात बर्नालाच्या जिंदाल घराण्याचा एकमेव दिवा विझला. चंदन जिंदालची प्रकृती बिघडली होती. 2 फेब्रुवारी रोजी त्याला मेंदूचा झटका आला होता. तेथील रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये त्याला दाखल करण्यात आले.
तो युक्रेनमध्ये चौथ्या वर्षात एमबीबीएसचे शिक्षण घेत होता. 2 फेब्रुवारी रोजी त्याला मेंदूचा झटका आला तेव्हा त्याचे वडील शिशनकुमार जिंदाल आणि काका कृष्णकुमार जिंदाल यांना याची माहिती देण्यात आली. दोघेही युक्रेनला गेले. याचदरम्यान तेथे युद्ध सुरू झाले. काका कृष्णकुमार जिंदाल 1 मार्चच्या रात्री बरनालाला परतले.
ही बातमी कळताच त्याच्या आई आणि बहिणीची रडून रडून अवस्था वाईट झाली आहे. जिल्हा व्यवस्थापकीय संकुलासमोरील गल्लीत राहणाऱ्या चंदन जिंदालची आई किरण जिंदाल आणि बहीण रशिमा जिंदाल यांची अवस्था बिकट आहे. ही बातमी बर्नाळा येथे पोहोचताच शहरातील वातावरण बदलले आहे.
पुर्ण शहरावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या निधनाबद्दल नातेवाईकांसोबतच शहरातील सामाजिक संस्थांनीही त्यांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे. चंदनचा मृतदेह आणि तिथे अडकलेल्या असहाय पित्याला सुखरूप घरी आणावे, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.
महत्वाच्या बातम्या
महाशिवरात्रीच्या निमित्ताने ‘या’ अभिनेत्रीने धारण केला अर्धनारीश्वरचा अवतार; लोकं हात जोडत म्हणाले…
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी शेतकऱ्याच्या मुलीने दिला खाते क्रमांक, जमा झाले तब्बल ‘एवढे’ कोटी
देशसेवा केल्यानंतर माजी सैनिकांनी केली जिरेनियमची शेती, कमावले लाखो रुपये, वाचा यशोगाथा
देशसेवा केल्यानंतर माजी सैनिकांनी केली जिरेनियमची शेती, कमावले लाखो रुपये, वाचा यशोगाथा