‘तुम्ही गद्दारी केली, डाकूंसोबत गेलात’; ८० वर्षांच्या आजोबांनी भर रस्त्यात बच्चू कडूंना झापले

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व अमान्य करत भाजपाच्या साथीने वेगळी चुल मांडली. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचत शिंदे यांनी भाजपाच्या साथीने मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळवली. शिंदे गटात गेलेल्या आमदारांविषयी काही लोकांच्या मनात राग असल्याचे पहायला मिळत आहे. यादरम्यान माजी मंत्री बच्चू कडू यांना एका वेगळ्या प्रकाराला सामोरे जावं लागलं आहे.

काल (दि. २७) माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांना कोर्टाने अडीच हजार दंड आणि एक दिवस कोर्ट संपेपर्यंत थांबण्याची शिक्षा दिली होती. त्यामुळे बच्चू कडू धाराशिव येथील कोर्टात तारखेसाठी हजर झाले होते. कामकाज संपल्यानंतर बच्चू कडू पुन्हा माघारी येत असताना एका ८० वर्षीय शेतकऱ्यांना बच्चू कडू यांची गाडी अडवली.

थेट गाडी अडवून शेतकरी गाडी समोर उभा राहिला. त्यावेळी द्दारी केल्याचा जाब शेतकऱ्याने बच्चू कडू यांना विचारला. या शेतकऱ्यांचे नाव अर्जुन भगवान घोगरे असे आहे. घोगरे म्हणाले की, तुम्ही गद्दारी का केली? तुम्ही काय वागत आहात. लोकशाही टिकवा. घटना टिकवून त्याप्रमाणे वागा. का जनतेला त्रास देत आहात, असा थेट सवाल ८० वर्षीय आजोबांनी केला.

यावेळी बच्चू कडू यांनी शेतकऱ्याच्या एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. बच्चू कडू यांच्या समर्थकांनी या शेतकऱ्याला अरेरावी करत त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी देखील त्याला बाजूला केले. शेवटी तिथून बच्चू कडू यांनी काढता पाय घेतला.

दरम्यान, २०१५ मध्ये सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे न्यायालयाने बच्चू कडू व इतर तीन जणांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. ही तक्रार धाराशिव शहरातील पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. या तक्रारीनुसार बच्चू कडू यांना विचित्र शिक्षा सुनावण्यात आली.

सत्र न्यायाधीश राजेश गुप्ता यांनी कलम ५०६ नुसार बच्चू कडू यांना दोषी धरत कोर्टाचे कामकाज संपेपर्यंत कोर्टात बसून राहणे व अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तसेच या प्रकरणातील इतर तिघांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. नोव्हेंबर 2015 मध्ये धाराशिव जिल्ह्य परिषदेत आंदोलन करण्यात आले होते. यावेळी बच्चू कडू आणि अधिकारी यांच्यात वाद झाला होता. या प्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-