सध्या सोशल मीडिया वापराचे प्रमाण खुप वाढले आहे. अनेकजण रिल्स काढून सोशल मीडियावर प्रसिद्ध होताना दिसत असतात. पण या रिल्समुळे अनेक धक्कादायक घटना घडल्याचेही समोर आले आहे. अशीच एक घटना परभणीच्या जिंतूरमध्ये घडली आहे.
रिल्स बनवणाऱ्या काही तरुणांनी एका जैन मुनींसह त्यांच्या सहकाऱ्याला जोरदार धडक दिली आहे. या अपघातामध्ये दोघांनाही गंभीर दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते चारही मुलं अल्पवयीन असून त्यांच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात जैन मुनींनी नकार दिला आहे.
सध्या जैन मुनींची प्रकृती स्थिर आहे. पण या घटनेमुळे परिसरातील लोकांनी मुलांवर संताप व्यक्त केला आहे. तसेच रिल्सच्या नादात तरुण काय करतील हे सांगता येत नाही. गेल्या काही दिवसांपासून रिल्सचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अपघाताच्या घटनाही काही समोर येत आहे.
जैन मुनी हे परभणीच्या बोरी येथून जिंतूरकडे जात होते. त्यावेळी काही तरुण मुलं तिथे रिल्स बनवत होते. रिल्स बनवण्याच्या नादात तरुणांनी त्यांना जोरदार धडक दिली. त्यामध्ये जैन मुनी सौम्यसागरजी आणि त्यांचे सेवेकरी संकेत मोहारे हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सध्या दोघांवरही उपचार सुरु असून त्यांची प्रकृती पुर्णपणे स्थिर आहे. मिळालेल्या माहितीनुसार रिल्स बनवणारे चारही तरुण अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. त्यांच्याविरोधात तक्रार करावी असे मदतीला धावून आलेल्या लोकांनी मुनींना सांगितले होते. पण मुनींनी तक्रा करण्यास नकार दिला आहे.
दरम्यान, नाशिकमध्ये रिल्सवरुनच एक विचित्र प्रकार घडला होता. एका १९ वर्षीय तरुणाने हातात तलवार घेऊन रिल्स काढल्या होत्या. त्याने त्या रिल्स काढून सोशल मीडियावर अपलोड करत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यासह तलवार खरेदी करणाऱ्या २८ वर्षीय तरुणाला अटक केली होती.
महत्वाच्या बातम्या-
निवडणूक झालेल्या तीन राज्यांपैकी ‘या’ दोन राज्यांमध्ये भाजपला बहुमत, तर एका ठिकाणी…
दोन रुपयांचा चेक मिळालेल्या शेतकऱ्याची कृषीमंत्री दादा भुसेंनी लावली थट्टा; म्हणाले, मालेगावमध्ये…
कोण मारणार बाजी? एक्झिट पोलमधून धाकधूक वाढवणारी आकडेवारी आली समोर