Share

..तेव्हा अमिषा पटेलला आईने कानाखाली लावून घरातून दिले होते हाकलून, ‘हे’ होते कारण

बॉलीवूडमध्ये चांगले नाव कमावलेली आणि सुंदर अभिनेत्री अमिषा पटेल (Amisha Patel) तिचा ४६ वा वाढदिवस साजरा करत आहे. अमिषा आज जरी फिल्मी दुनियेपासून दूर असली तरी तिच्या अभिनयाने सर्वांनाच प्रभावित केले आहे. अमीषा पटेलने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे, ज्यापैकी काही हिट तर काही फ्लॉप ठरले, मात्र प्रत्येक चित्रपटातील तिच्या अभिनयाने लोकांची मने जिंकली. अमीषाने आपल्या करिअरची सुरुवात हृतिक रोशनसोबत (Hrithik Roshan) ‘कहो ना प्यार है’मधून केली होती. विशेष बाब म्हणजे या दोघांचा हा पहिलाच चित्रपट होता आणि तो सुपरहिट ठरला.(Amisha Patel, Hrithik Roshan, Kaho Na Pyaar Hai, Gadar, Vikram Bhatt)

या चित्रपटामुळे अमिषा पटेल रातोरात स्टार बनली. याशिवाय ‘गदर’ चित्रपटात ‘सकीना मॅडम’ची भूमिका साकारून तिने स्वत:ला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सिद्ध केले. या व्यक्तिरेखेनंतर आणि चित्रपटानंतर चाहते अमिषाला सकीना मॅडम म्हणू लागले. पाहिलं तर अमिषा पटेलची कौटुंबिक पार्श्वभूमी इंडस्ट्रीशी निगडित नसून तिने स्वत:च्या बळावर इंडस्ट्रीत स्वत:चं नाव कमावलं आहे.

अमीषाचा जन्म ९ जून १९७६ रोजी एका गुजराती कुटुंबात झाला. तिने अमेरिकेतील टफ्ट्स विद्यापीठातून अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले आणि सुवर्णपदकही जिंकले. यानंतर ती मुंबईत आली, जिथे तिने चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. अमिषाच्या साधेपणासोबतच तिची डायलॉग डिलिव्हरी चाहत्यांनाही हळूहळू वेड लावू लागली. तिचे सौंदर्य आणि हास्य चाहत्यांच्या मनात घर करून गेले.

अमीषाने तिच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले असले तरी तिने अचानक स्वतःला इंडस्ट्रीपासून दूर केले आणि स्टारडमपासून दूर ठेवले. याशिवाय चित्रपटांमध्ये काम करताना अमीषाचे नाव अनेक वादांशीही जोडले गेले होते, ज्यामुळे तिचे कुटुंबाशी असलेले नाते खूप चर्चेत आले होते. अमिषाने तिच्या कुटुंबीयांवरही अनेक गंभीर आरोप केले आहेत.

अमिषाने तिच्या आई-वडिलांवर पैशांची अफरातफर केल्याचा आरोप करून खूप चर्चेत आली होती. एवढेच नाही तर तिने स्वतःच्या आई-वडिलांना कायदेशीर नोटीस पाठवून १२ कोटी रुपये परत करण्याची मागणी केली होती. यानंतर, २००२ मध्ये अमिषा आणि हृतिक दोघेही पुन्हा एकदा ‘आप मुझे अच्छे लगने लगे’ या चित्रपटात एकत्र दिसले. या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन विक्रम भट्ट यांनी केले होते.

बातमीनुसार, या चित्रपटाच्या सेटवर विक्रम भट्ट आणि अमिषा पटेल यांच्यात जवळीक वाढू लागली होती. यानंतर हळूहळू दोघेही खूप जवळ येऊ लागले. असे म्हटले जाते की, दोघेही जवळपास ५ वर्षे एकमेकांना डेट करत होते. त्यादिवसांत त्या दोघांच्या नात्याबद्दलच्या चर्चांना तोंड फुटले होते.

जेव्हा अमीषा पटेलच्या विक्रम भट्टसोबतच्या अफेअरची बातमी तिच्या पालकांना समजली तेव्हा त्यांनी त्याला विरोध केला. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, दिग्दर्शक विक्रम भट्टसोबतच्या अफेअरमुळे अमिषाला तिच्या आईने चप्पलने मारहाण केली आणि घराबाहेर काढले. या दोन्ही प्रकरणांनी अमिषा प्रसिद्धीच्या झोतात आली होती. अनेक वर्षांपासून अमिषाचा तिच्या कुटुंबाशी संबंध आला नाही आणि ती वेगळी राहू लागली.

महत्वाच्या बातम्या-
काँग्रेस नेत्याच्या मुलाने प्रपोज केल्यानंतर अमीषा पटेलने केला मोठा खुलासा, म्हणाली, मी आणि फैसल..
अमीषा पटेलला या काँग्रेस नेत्याचा मुलगा म्हणाला, माझ्यासोबत लग्न करणार का? अमीषा पटेल म्हणाली..
PHOTO: वयाच्या ४५ व्या वर्षीही अमिषा पटेलने तोडल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा, टू-पिस घालून केला कहर
वयाच्या ४५ व्या वर्षीही अमिषा पटेलचा बोल्डनेस कायम, फक्त टी शर्टवर असताना शेअर केला व्हिडीओ

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now