Homeताज्या बातम्याकाँग्रेस नेत्याच्या मुलाने प्रपोज केल्यानंतर अमीषा पटेलने केला मोठा खुलासा, म्हणाली, मी...

काँग्रेस नेत्याच्या मुलाने प्रपोज केल्यानंतर अमीषा पटेलने केला मोठा खुलासा, म्हणाली, मी आणि फैसल..

बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल काही दिवसापूर्वी माध्यमात फारच चर्चेत आली होती. काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचा मुलगा फैसल पटेलने तिला सार्वजनिकरित्या लग्नाची मागणी घातली होती. मात्र, काही वेळाने त्याने त्याचे ट्वीट डिलीट केले. मात्र, तोपर्यंत त्याच्या ट्विटचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले आणि त्यांच्याबाबत चर्चा सुरु झाली. तर या सर्व प्रकारानंतर अमीषा पटेलने पहिल्यांदाच तिची प्रतिक्रिया दिली आहे.

बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अमिषाने सांगितले की, ‘हे खूप हास्यास्पद आहे. मी आणि फैसल एकमेकांना अनेक वर्षापासून ओळखतो. फैजलसोबत आणि त्याच्या बहिणीसोबत माझी चांगली मैत्री आहे. तो मेसेज आमच्यातला केवळ एक विनोदाचा भाग होता. फैसलला अशा प्रकारचे विनोद करायला आवडतात. त्यापेक्षा अधिक आमच्यात काही नाही’, असे तिने यावेळी सांगितले.

पुढे बोलताना अमीषाने सांगितले की, ‘मला माहित आहे की अनेक सेलिब्रिटी लग्न करत आहेत. पण मी सिंगल आहे आणि सिंगल राहण्यातच मी आनंदी आहे. तसेच सध्या कोणत्याही रिलेशनशीपमध्ये राहण्याचा मी विचार करत नाहिये. आणि सध्या त्यासाठी माझ्याकडे वेळही नाहिये’.

https://www.instagram.com/p/CX_MdLKKFpu/

अमिषाने ३० डिसेंबर रोजी ट्विटरवर काही फोटो शेअर करून फैजल पटेलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तिने लिहिले होते की ‘हैप्पी बर्थडे माय डार्लिंग फैसल पटेल, लव्ह यु. तुझे वर्ष चांगले जावो’. त्यासोबत बरेच हृदय इमोजी देखील तिने पोस्ट केले होते.

यानंतर फैसल पटेलने तिच्या ट्विटला उत्तर देत लिहिले की, ‘धन्यवाद अमिषा पटेल. मी आता तुला पब्लीकली प्रपोज करत आहे तू माझ्याशी लग्न करशील का?’ फैसलचा हा ट्विट इंटरनेटवर वेगाने व्हायरल झाला. त्यानंतर फैसलने हा ट्विट डिलीट केला. मात्र, तोपर्यंत त्याच्या ट्विटचा स्क्रीनशॉट सर्वत्र व्हायरल झाला.

याबाबत बोलताना अमिषाने सांगितले की, ‘मी फैसलला म्हटले होते की, तू ट्विट डिलीट करायला नको होतास आणि मी त्यावर माझ्या शैलीत उत्तर दिले असते. पण त्याने सांगितले की, त्याला अनेक लोकांकडून याबाबत फोन येत होते. तसेच प्रसिद्ध व्यक्तींसोबत असेच होते. त्यांना सार्वजनिक ठिकाणी साधा विनोदही करता येत नाही’.

महत्त्वाच्या बातम्या : 

मोदींच्या सुरक्षेतील ढिसाळपणावर बाॅलीवूड कलाकार संतापले; म्हणाले, लाज वाटली पाहीजे…
पंजाबात पंतप्रधानांचा रस्ता अडवनारे आंदोलक भाजपचेच? ‘तो’ व्हिडीओ समोर आल्याने उडाली खळबळ
कुणाला कामराने दिला मोदींना पाकिस्तानात जाण्याचा सल्ला; काय आहे नेमके प्रकरण…

ताज्या बातम्या