Homeताज्या बातम्याअमीषा पटेलला या काँग्रेस नेत्याचा मुलगा म्हणाला, माझ्यासोबत लग्न करणार का? अमीषा...

अमीषा पटेलला या काँग्रेस नेत्याचा मुलगा म्हणाला, माझ्यासोबत लग्न करणार का? अमीषा पटेल म्हणाली..

अमिषा पटेल सध्या तिच्या ‘गदर २’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती पुन्हा एकदा सनी देओलसोबत तिच्या जुन्या भूमिकेत दिसणार आहे. पण आता अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे इंटरनेटवर अधिराज्य गाजवत आहे. फैसल पटेल नावाच्या व्यक्तीने तिला प्रपोज केले आहे. मात्र, नंतर फैसलने त्याचे ट्विट डिलीट केले.

फैजलसोबत अमीषा अनेकवेळा दिसली आहे पण दोघांनी कधीही त्यांच्या नात्याचा खुलासा केलेला नाही. मात्र फैजलच्या ट्विटनंतर तो अमिषाच्या आयुष्यात असल्याचे स्पष्ट झाले. प्रकरण असे आहे की ३० डिसेंबर २०२१ रोजी अमिषा पटेलने ट्विटरवर काही फोटो शेअर करून फैसल पटेलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

अमीषाने लिहिले, “हैप्पी बर्थडे माय डार्लिंग फैसल पटेल, लव्ह यु. तुझे वर्ष चांगले जावो.” त्यासोबत बरेच हृदय इमोजी देखील होते. यानंतर फैसल पटेलने उत्तरात लिहिले की, “धन्यवाद अमिषा पटेल. मी आता तुला पब्लीकली प्रपोज करत आहे तू माझ्याशी लग्न करशील का?” हे ट्विट डिलीट करण्यात आले आहे पण अमिषा फैसलला डेट करत असल्याचं सगळ्यांना कळलं.

फैजलबद्दल बोलायचे तर तो काँग्रेस नेते अहमद पटेल यांचा मुलगा आणि एक यशस्वी उद्योगपतीही आहे. फैझलचे लग्न झैनाब पटेलशी झाले आहे, पण ७ जून २०१६ रोजी त्याच्या पत्नीचे निधन झाले. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या समस्येमुळे झाला होता. बरं, या वर्षी आणखी एक नवीन जोडपं लग्न करताना दिसेल का? २०२२ मध्ये लग्न करू शकतील अशा अनेक जोडप्यांकडे चाहत्यांची नजर आहे. आता या यादीत अमिषा आणि फैजलचीही नावे जोडली जाऊ शकतात.