Share

…तर तुम्हाला त्याची किंमत चुकवावी लागेल, अमेरीकेची भारताला जाहीर धमकी; जाणून घ्या कारण

युक्रेनवरील हल्ल्यामुळे रशियावर लादण्यात आलेल्या निर्बंधांदरम्यान, अमेरिका रशियाकडून कोणत्याही प्रकारचे आयात वाढवू नये यासाठी भारतावर सतत दबाव आणत आहे. असे असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे सर्वोच्च आर्थिक सल्लागार ब्रायन डीझ यांनी थेट भारताला धमकीच दिली आहे. (america threating india because of russia)

भारताला रशियासोबतच्या युतीची मोठी किंमत मोजावी लागू शकते. याप्रकरणी चीन आणि भारताने घेतलेल्या निर्णयावर आम्ही पुर्णपणे निराश आहोत, असे ब्रायन डीझ यांनी म्हटले आहे. त्यांनी एकप्रकारे भारताला ही धमकीच दिली आहे. पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी हे म्हटलं आहे.

युक्रेन संकटावर भारत आणि चीनने दाखवलेल्या तटस्थेमुळे अमेरिका खूपच निराश झाली आहे. एकीकडे अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, जपान या देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहे. तर दुसरीकडे भारत हे निर्बंध स्वीकारण्यास नकार देत आहे, असे डीझ यांनी म्हटले आहे.

भारत रशियाकडून तेल आयात करत आहे. या प्रकरणावर भारताची प्रतिक्रिया वॉशिंग्टनशी असलेले संबंध गुंतागुंतीचे बनवत आहे. आशियामध्ये जिथे भारताकडे चिनी प्रभावाचा मुकाबला करण्यासाठी एक महत्वाचा भागीदार मानला जात आहे. तिथे भारताची अशी भूमिका योग्य नाही, असेही डीझ यांनी म्हटले आहे.

रशिया भारताला सवलतीच्या दरात इंधन तेल पुरवत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशिया भारताला प्रति बॅरल ३५ डॉलर पर्यंत सूट देत आहे. रशियावर लादलेल्या निर्बंधांमुळे, रशियाला डॉलरमध्ये व्यापार करणे शक्य नाही, म्हणून दोन्ही देश पेमेंटच्या इतर पद्धतींवर बोलणी करत आहेत.

या अहवालांदरम्यान, अमेरिकेचे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार दलीप सिंग बुधवारी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहे. यावेळी भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये यासाठी दबाव आणला. यावेळी त्यांनी भारताने रशियाशी संबंध वाढवू नयेत, असे आवाहन केले.

महत्वाच्या बातम्या-
Prajakta Mali Photo : प्राजक्ताची गुलाबी अदा पाहून चाहते झाले फिदा; म्हणाले, परत एकदा पडलो तुझ्या प्रेमात
मुलाच्या चित्रपटाला प्रोमोट केलं म्हणून ट्रोल करणाऱ्यांवर अमिताभ भडकले, म्हणाले, ‘क्या कर लोगे?’
अखेर तोडगा निघाला! आमचं आंदोलन यशस्वी, आम्हाला न्याय मिळाला, एसटी कर्मचाऱ्यांचा जल्लोष

ताज्या बातम्या आंतरराष्ट्रीय

Join WhatsApp

Join Now