विमल इलायचीच्या जाहिरातीमुळे अक्षय कुमारला ट्रोल केले जात आहे. पण अल्लू अर्जुनने या सगळ्या प्रकरणाची चर्चा असताना चाहत्यांचे मन जिंकले आहे. अल्लू अर्जुनने तंबाखू ब्रँडची ऑफर नाकारल्याचे वृत्त आहे. अल्लू अर्जुनला तंबाखू कंपनीने करोडो रुपयांची ऑफर दिल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, त्याने ही ऑफर स्वीकारली नाही कारण त्याला त्याच्या चाहत्यांना काही चुकीची सवय लावायची नाही. काही काळापूर्वी अमिताभ बच्चन एका पान मसाल कंपनीच्या जाहिरातीत दिसले होते. बिग बींनी या कंपनीसोबतचा करार संपुष्टात आणला आणि घेतलेली फीही परत केल्याची बातमी आल्यानंतर सोशल मीडियावर त्यांना खूप ट्रोल करण्यात आले होते.
एवढेच काय शाहरूख खानलाही अजय देवगणसोबत पान मसाल्याच्या जाहिरातीत पाहिल्याने नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते पण अल्लू अर्जुनच्या या निर्णयाने अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे. अल्लू अर्जुनशी संबंधित अशी एक माहिती जी ऐकून त्याच्या चाहत्यांच्या मनात त्याच्याबद्दल आणखी आदर वाढेल.
पिंकविलाच्या रिपोर्टनुसार अल्लू अर्जुनला एका तंबाखू कंपनीने ब्रँड एंडोर्समेंटसाठी मोठी रक्कम ऑफर केली होती. मात्र, अल्लूने ही ऑफर नाकारली. रिपोर्टनुसार, अल्लू अर्जुनच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले की, अल्लू अर्जुनला तंबाखूच्या ब्रँडसाठी जोरदार ऑफर मिळाली होती परंतु तो स्वतः तंबाखू खात नसल्याने त्याने ती ऑफर नाकारण्यास जराही वेळ लावला नाही.
ही जाहिरात पाहिल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी हे उत्पादन खायला सुरुवात करावी असे त्याला वाटत नाही, ज्यामुळे त्यांना वाईट व्यसन लागू शकतं. या कारणामुळे त्याने ही जाहिरात नाकारली असल्याचे सांगण्यात येत आहे. चित्रपटात धुम्रपान करणे त्याच्या हातात नसून जेव्हा शक्य असेल तेव्हा तो ते टाळण्याचा संदेश देतो, असे सूत्राने सांगितले.
शाहरुख खाननंतर अजय देवगणसोबत अक्षय कुमार विमलच्या जाहिरातीत सामील झाला आहे. यावरून अनेकांनी त्यांना ट्विटरवर ट्रोल केले. याप्रकरणी सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. अल्लू अर्जुनने पुन्हा एकदा चाहत्यांना दाखवून दिले आहे की पैसा हा त्याच्यासाठी सर्वस्व नाही. चाहते त्याच्यासाठी महत्वाचे आहेत.
महत्वाच्या बातम्या
चहलने हॅट्रीक घेताच धनश्री वर्मा मैदानातच लागली उड्या मारायला; व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल
…अन् अचानक कळपातील हत्तीने थांबून मानले कार चालकाचे आभार; पहा हैराण करणारा व्हिडिओ
लोकांना झटपट श्रीमंतीचं स्वप्न दाखवणाऱ्या Amway कंपनीला ईडीचा दणका; कोट्यवधींची संपत्ती जप्त
इफ्तार पार्टीत ‘या’ व्यक्तीने सलमान खानला बळजबरीने केला किस, व्हिडिओ पाहून चाहते झाले हैराण