VIDEO: खड्ड्यात पडलेल्या हत्तीला जेसीबीने बाहेर काढले मग पहा पुढे हत्तीने काय केले

सोशल मीडियार अनेक रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. रोज लाखोंच्या संख्येने अपलोड होणारे व्हिडिओमध्ये काही व्हिडिओ खुप चर्चेचा विषय ठरतात. अनेक व्हिडिओ हे लोकांना हसवणारे पण असतात, तर अनेक व्हिडिओ लोकांना आश्चर्याचा धक्का देणारे असतात.

सध्या सोशल मीडियावर एका हत्तीचा व्हिडिओ खुप व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमध्ये एक हत्तीचे पिल्लु एका खड्ड्यात पडला आहे. त्यानंतर त्याला जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात आले आहे. हा व्हिडिओ कर्नाटकमधला आहे.

कर्नाटकमधील कुर्ग जिल्ह्यात हा व्हिडिओ आहे. तिथल्या जंगताल सतत पडणाऱ्या पावसामुळे चिखल झाला आहे. त्यामुळे एक हत्ती न कळत तिथे असणाऱ्या खड्ड्यात पडला आहे. पण त्याला जेसीबीच्या मदतीने बाहेर काढण्यात आले आहे.

हत्तीने आधी खड्ड्यातून बाहेर येण्यासाठी खुप प्रयत्न केले होते, पण तो अपयशी ठरत होता. त्यानंतर त्या हत्तीच्या मदतीला प्रशासन आणि वनविभाग धावून आला आहे. त्याला जेसीबीच्या मदतीने बाहेर काढण्यात येत होते. विशेष म्हणजे तो स्वत:प्रयत्न करत असल्याने त्याला बाहेर काढणे सहज शक्य झाले आहे.

खड्ड्यातून बाहेर आल्यानंतर मात्र हत्ती जेसीबीसोबत दोन हात करण्याच्या विचार करताना दिसत आहे. पण जेसीबी चालकाने त्याला जंगलाकडे जाण्याचा रस्ता दाखवला आहे. ज्यामुळे त्याला सुरक्षित जंगलाकडे जाता येईल.

हा व्हिडिओ भारतीय वनसेवेत कार्यरत असणाऱ्या सुधा रमण यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत १२ लाख लोकांनी बघितला आहे.

महत्वाच्या बातम्या-

कोणत्या राज्यातील मुख्यमंत्र्यांना किती मिळतो पगार? उत्तर प्रदेश आहे तिसऱ्या क्रमांकावर तर महाराष्ट्र….
“महाराष्ट्राच्या जनतेला उध्दव ठाकरे आणि नरेंद्र मोदी दोघांमध्येही भविष्य दिसत नाही”
…म्हणून मनीषा कोईरालाने सुपरहिट चित्रपट ‘जुबेदा’ला दिला होता नकार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.