Share

‘नुपूर शर्माचा शिरच्छेद करेल त्याला मी माझं घर देईल’, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दर्ग्याच्या खादिमला अटक

napur sharma

वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अजमेर दर्गाचा खादिम सलमान चिश्ती याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. काल रात्री सलमान चिश्तीला अटक केल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक, विकास सांगवान यांनी सांगितलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, सलमान चिश्ती याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याच पोलिसांनी सांगितलं आहे.

याबाबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक विकास सांगवान यांनी माहिती देताना म्हंटलं आहे की, खादीम सलमान चिश्ती याला रात्री १२ वाजता ४५ मिनिटांनी अटक करण्यात आली. सलमान चिश्ती याच्यावर याआधी अनेक गुन्हे दाखल आहे. सध्या टो पोलिसांच्या ताब्यात आहे.

नुकताच अजमेरमधून एक वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये अजमेर दर्ग्याचे खादिम सलमान चिश्ती यांनी भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्माच्या यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. या प्रकरणी सलमान चिश्ती याला पोलिसांनी अटक केली आहे.

वाचा काय आहे नेमकं प्रकरण..?
‘जो नुपूर शर्मा यांचा शिरच्छेद करेल, त्याला मी माझे घर देईन’, असे वादग्रस्त विधान अजमेर दर्ग्याचे खादिम सलमान चिश्ती यांनी केलं आहे. अजमेर दर्ग्याचे खादिम सलमान चिश्ती यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून राजस्थानमध्ये खळबळ उडाली आहे.

तसेच व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये अजमेर दर्ग्याचा खादिम सलमान चिश्ती म्हणाला की, “वेळ पूर्वीसारखी नाही. आईची शपथ घेऊन सांगतो मी तिला जाहीरपणे गोळ्या घातल्या असत्या. माझ्या मुलांची शपथ घेऊन मी तिला गोळ्या घातल्या असत्या. आजही मी छातीठोकपणे सांगतो, जो कोणी नुपूर शर्माचा शिरच्छेद करेल, त्याला मी माझे घर देईन.”

सलमान चिश्तीचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजस्थानमधील नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अजमेर शहरातील अलवर गेट पोलिस ठाण्यात सलमान चिश्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीसांनी अजमेर दर्ग्याचे खादिम सलमान चिश्ती याला अटक केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या
‘मतदारसंघात येऊ द्या, आम्ही दांडे सोलून ठेवलेत’, महिला शिवसैनिक बंडखोरांविरोधात आक्रमक
मुले खायला मागतील म्हणून झोपूनच ठेवतात पालक, महागाईमुळे ‘या’ देशात बिकट परिस्थिती
अजय देवगणवर टीका करताना KRK कडून झाली मोठी चूक, लोकांनी केले ट्रोल, म्हणाले…
मुख्यमंत्री न बनवल्यामुळे देवेंद्र फडणवीस अजूनही नाराज? बॅनरवरून शहांचा फोटो वगळला

इतर क्राईम ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now