Ajit pawar | अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल विधानसभेत एक वक्तव्य केलं होतं ज्यानंतर त्यांच्यावर सडकून टीका होत आहे. विरोधकांनी त्यांना वेठीस धरले आहे. अजित पवारांनी माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे. अजित पवार म्हणाले होते की, छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते.
त्यांना धर्मवीर म्हणण्याची आवश्यकता नाही. त्यांच्या या विधानानंतर राज्यातील सत्ताधारी पक्ष शिंदे गट आणि भाजप आक्रमक झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार या वादावर शांत होते पण आता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
प्रसारमाध्यमांसमोर येत त्यांनी भाजपलाच आव्हान दिलं आहे. ते आपल्या विधानावर ठाम आहेत असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. या वादावर स्पष्टीकरण देताना अजित पवार म्हणाले की, द्वेशाचं राजकारण करणं मला मान्य नाही. छत्रपती संभाजी महाराजांबाबत मी सभागृहात केलेल्या विधानावर मी ठाम आहे.
छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षक म्हणणं अधिक संयुक्तिक आहे. तसेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचं रक्षण केलं. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हणणं त्यांना न्याय देणारं आहे. मी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काहीही चुकीचं बोललो असं मला वाटत नाही.
मी माझी भूमिका मांडली, ज्यांना योग्य वाटत असेल त्यांनी स्विकारावी, असे अजित पवार स्पष्टच बोलले. अजित पवार असंही म्हणाले की, स्वराज्यरक्षणामध्ये सर्व गोष्टी येतात. मी वादग्रस्त विधान केलेलं नाही. वादग्रस्त विधान तर राज्यपाल, भाजपचे नेते आणि मंत्र्यांनी केलं होतं. त्यांच्यावर कधी कारवाई करणार? मी माझ्या विधानावर आजही ठाम आहे, मला विरोधी पक्षनेतेपद हे भाजपने दिलेलं नाही. त्यामुळे माझा राजीनामा मागण्याचा अधिकार भाजपला नाही.
जेव्हा मी सभागृहात बोललो तेव्हा सर्वजण शांत होते. त्यानंतर जे घडले ते घडवणारा मास्टरमाईंड तिथे नव्हता. माझ्याविरोधात आंदोलन करण्याचे आदेश दिले गेले. मी काही इतिहास संशोधक नाही. मी जे काही वाचलं त्यावरून माझं मत जे मत बनलं ते मी मांडलं, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.
महत्वाच्या बातम्या
धनंजय मुंडेचा भीषण अपघात; गंभीर जखमी अवस्थेत एअर ॲम्बुलन्सने मुंबईला हलवले
गौतमी पाटीलच्या पहील्या चित्रपटात तिच्यासोबत झळकणार ‘हा’ दिग्गज अभिनेता; पहा कुणाला लागली लाॅटरी
asim sarode : राज्यात लवकरच राष्ट्रपती राजवट लागू शकते कारण…; कायदेतज्ञ असीम सरोदे यांचे मोठे वक्तव्य
eknath shinde : औरंगजेब क्रुर अन् हिंदूद्वेष्टा नव्हता म्हणणाऱ्या आव्हाडांवर मुख्यमंत्री शिंदे संतापले; म्हणाले, त्याचा पुळका…