asim sarode on maharashtra government | एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपसोबत हात मिळवत राज्यात सरकार स्थापन केले आहे. एकनाथ शिंंदेसोबत शिवसेनेचे ४० आमदारही गेले होते. त्यामुळे शिवसेनेसाठी हा मोठा धक्का होता. शिंदेंनी भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यामुळे शिवसेना न्यायालयात गेली आहे.
तसेच या प्रकरणावर निर्णय देण्यासाठी न्यायालयाने पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ स्थापन केले आहे. त्यामुळे याप्रकरणी काय निकाल लागणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. असे असताना आता कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते, असे सरोदे यांनी म्हटले आहे.
आता सध्या पाच न्यायाधीशांचे घटनापीठ आहे. पण ते सात न्यायाधीशांचे घटनापीठ पाहिजे, अशी आमची मागणी आहे. याप्रकरणात नवीन न्यायाधीशांना घेण्यात येईल त्यांचा समावेश करुन याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे असीम सरोदे यांनी म्हटले आहे.
आपण भारतीय संविधानाच्या दहाव्या शेड्युलचा विचार केला तर दहाव्या परिशिष्टातील २१ ए नुसार स्पष्टपणे पक्षविरोधी कारवाया जे करत असतील, त्यांना अपात्र ठरवण्यात येऊ शकते, असेही असीम सरोदे यांनी म्हटले आहे.
तसेच शिंदे गटातील आमदारांनी पक्ष सोडला नसला तरी स्वत:च्या वागणुकीनुसार त्यांनी पक्षविरोधी काम केलं आहे. त्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात येऊ शकते. इतकंच नाही तर काही काळासाठी राष्ट्रपती राजवट सुद्धा लागू शकते, असे असीम सरोदे यांनी म्हटले आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बेताल वक्तव्य केल्यामुळे राज्यात संतापाची लाट आहे. त्यावरही असीम सरोदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, राज्यपाल भगतसिंग हे बेताल वक्तव्य करणाऱ्यांचे कर्णधार आहे. राज्यपाल पद सोडून त्यांना पुन्हा तिथे जाण्याची गरज आहे, जिथून ते आले आहे.
राज्यपाल हे त्यांचे राजकीय पक्षाचे विचार बाजूला ठेऊ शकलेले नाही. ते अजूनही एका पक्षाचे प्रतिनिधित्व करत असल्यासारखे वागत आहे. त्यामुळे ते सातत्याने चुकीचे आणि वादग्रस्त विधाने करत आहे, असेही असीम सरोदे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
..तर मी तुमचे मंत्रीपद काढून घेईल; पंतप्रधान मोदींनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना खडसावले
महाराष्ट्रातील सर्वात मोठी फॅमिली! एका वेळेला लागतो १५०० चा भाजीपाला, २० लिटर दूध
मित्रांच्या मिठीत काजोल-अजय देवगणची लेक झाली बेफाम; लोकं म्हणाली १९ व्या वर्षी हे काय चाललय