सध्या राजकीय वर्तुळात मोठी उलथापालक झाल्याचं पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले. पण उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री पद गेलं का? यावर आजही सवाल उपस्थित होताना पहायला मिळत. यावर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
शुक्रवारी सकाळ समूहाने आयोजित केलेल्या ‘दिलखुलास दादा’ या कार्यक्रमात अजित पवार यांनी अनेक राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करताना दिसत आहेत. त्यामुळे अजित पवार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
अजित पवार म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्यावर प्रचंड दबाव होता. आपल्याला जिवाभावाचे सहकारी इतक्या मोठ्या संख्येने सोडून जातील असं त्यांना वाटलंच नव्हतं. त्यावेळी १५ ते १६ आमदार त्यांना सोडून गेल्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर बरेच आमदार हे मातोश्रीवर होते.
यादरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना सर्व पक्षातील नेत्यांनी ज्या जबाबदारीने आमदार सांभाळायचे काम केले. तसेच, काम एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या वेळी महाविकास आघाडीतील नेत्यांनी आमदार सांभाळले असते. तर आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे.
अजित पवार भाजपमध्ये जाणार का? यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील आपले मत व्यक्त केले आहे. तसेच अजित पवारांनी देखील या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. मात्र, तरीही या चर्चा थांबण्याचं नाव घेत नाही. तर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतल्यावर काय झाले? यावर अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
अजित पवार म्हणाले की, राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचे ऐकले आहे. आम्ही शरद पवारांना सर म्हणायचो. आम्ही उद्धव ठाकरेंनाही सांगितले होते. महाराष्ट्रात ज्या दिवशी उद्धव ठाकरेंचे सरकार आले, त्याच दिवसापासून भाजप सरकार बदलण्याचा प्रयत्न करत होता. ते एका दिवसात झाले नाही.
महत्त्वाच्या बातम्या
खारघर उष्माघात प्रकरणातील मृतांचा पोस्टमॅटर उत्तर धक्कादायक खुलासे; डॉक्टर म्हणाले, “त्यांच्या शरीरात…
अभिषेक-ऐश्वराच्या अवघ्या; ११ महिलांची न्यायालयीन धाव. आराध्या बच्चन महिला नेमकं काय घडलं?
अजित पवारांचे बंड केले तर सेनापतीसह सेना भाजपमध्ये; राष्ट्रवादीला खांडर