एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदारांच्या बंडामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा आता फुट पडणार असल्याची चर्चा होती. असे असतानाच आता राष्ट्रावादीच्या नगरसेवकांची बैठक बोलवण्यात आली आहे.
अजित पवार यांनी ठाण्यातील नगरसेवकांची तातडीने बैठक बोलावली आहे. विधानभवानामध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक फुटीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना १ ते २ कोटी रुपयांच्या ऑफर देण्यात आल्या आहे, असा आरोप जितेंद्व आव्हाड यांनी केला होता. त्यांच्या या ऑफरनंतर राष्ट्रवादीत कोणकोण निष्ठावान आहे हे पाहण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली असल्याचे म्हटले जात आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप केल्यानंतर अजित पवार यांनी नगरसेवकांची बैठक बोलावली आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना आपल्या पक्षात प्रवेश करण्यासाठी १ ते २ कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. त्यानंतर या गोष्टी विचारात घेऊन अजित पवारांनी ही बैठक घेतली होती.
ऑफरमुळे नगरसेवक फुटू नये यासाठी अजित पवारांनी ही बैठक घेतली होती. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, ठाण्यातील नगरसेवक राष्ट्रवादीसोबत उभे राहतील. मी सुद्धा बैठकीतून आलो आहे. काही अडचण होईल असे मला वाटत नाही.
तसेच जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याला लवकरच अटक होऊ शकते असे सांगितले होते. त्याच्यावरही चर्चा झाली आहे. त्यामुळे गरज पडली तर आव्हाडांशिवाय ही निवडणूक लढावी लागेल आणि जिंकावी लागेल. वेळ पडला तर त्यांच्याशिवाय निवडणूकीची तयारी करावी लागेल, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
महिलांना घरबसल्या मिळणार १५ हजार रुपये, मोदी सरकारने आणली भन्नाट योजना; जाणून घ्या डिटेल्स
महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे नेते मानस पगार यांचे अपघाती निधन; सर्वपक्षीय तरूण हळहळले
शुभमन गिलचे शतक आणि गोलंदाजांचा जलवा, भारताचा न्युझीलंडविरूद्ध सर्वात मोठा विजय