सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी दिवसभर ते गुजरातला होते. त्यानंतर ते आसामला रवाना झाले. त्यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार असल्याचेही म्हटले जात आहे.
एकनाथ शिंदेंसोबत चर्चा करण्यासाठी मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक गेले होते. त्यांची समजूत काढण्यासाठी ते गेले पण त्यांचेही एकनाथ शिंदेनी ऐकले नाही. उलट त्यांनी नार्वेकरांमार्फत उद्धव ठाकरेंकडे संदेश पोहोचवला की, आम्ही दिलेल्या ऑफरवर शिवसेनेने विचार करावा नाहीतर परतीचे दोर कापले जातील. मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदेंकडे ४० आमदारांचे पाठबळ आहे.
एकनाथ शिंदेंनी ठाकरे सरकार खिळखिळे केले आहे. उद्धव ठाकरे आता हतबल झालेले दिसत आहेत. अशातच आता आदित्य ठाकरेंनीही मोठे पाऊल उचलले आहे. असे बोलले जात आहे की आदित्य ठाकरे मंत्रीपद सोडू शकतात. कारण त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून मंत्रिपदाचा उल्लेख हटवला आहे. त्यांनी आपल्या ट्विटरवरून मंत्रिपदाचा उल्लेख हटवल्याने असं बोललं जात आहे की, आदित्य ठाकरे लवकरच राजीनामा देऊ शकतात. दरम्यान,
राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ट्वीटनं महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. राज्यातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्त होण्याच्या दिशेनं सुरू आहे, असं सूचक ट्विट राऊत यांनी केलं आहे.
आपल्या ट्विटमधून संजय राऊत यांनी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचे संकेत दिलेत. राऊत यांनी ट्विटर हँडलवरुन ट्वीट केलं आहे की, “महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने..”
तर दुसरीकडे राऊतांनी अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री ठाकरेंच्या राजीनाम्याचे संकेत दिले असल्याचं सध्या राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. शिंदेंनी आज सकाळी सुरतमधून गुवाहाटीमध्ये पोहचल्यानंतर आपल्यासोबत ४० आमदार असून त्यापैकी ३३ आमदार हे शिवसेनेचे असल्याचं जाहीर केलं होतं.
महत्वाच्या बातम्या
‘गुजरातमध्ये जरूर दांडिया खेळा, पण महाराष्ट्रात तलवारीला तलवार भिडेल’ शिवसेनेचा एकनाथ शिंदें गटाला इशारा
बंडखोरीची स्क्रिप्ट दोन महिन्यांपूर्वीच तयार करण्यात आली होती, आमदाराचा मोठा खुलासा; म्हणाला..
राज्यात होणार राजकीय भूकंप! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज घेणार मोठा निर्णय; सत्तेतून पडणार बाहेर?
शिवसेनेला धक्का! उद्धव ठाकरेंच्या सर्वात जवळचा आमदार शिंदेंच्या गोटात; रात्रीतून सुरतला पलायन