Share

थेट घरात घुसून घातली लग्नाची मागणी अन् पळून जाऊन ५० रुपयात केले लग्न! वाचा आदेश बांदेकरांची भन्नाट लव्ह स्टोरी

Aadesh Bandekar

Adesh Bandekar: होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आदेश बांदेकर अवघ्या महाराष्ट्राचे ‘भाओजी’ झाले आहेत. आज त्यांचा 57 वा वाढदिवस साजरा होतोय. होम मिनिस्टर च्या माध्यमातून महाराष्ट्र दौरा करत त्यांनी कित्येक वहिनींना त्यांच्या प्रेमकहाण्या विचारल्या आहेत. मात्र खुद्द आदेश बांदेकर यांची सुद्धा सुचित्रा बांदेकर यांचे ‘मिस्टर’ होण्याची कहाणी फिल्मी आहे.

मागच्या वर्षी आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांनी त्यांच्या लग्नाचा 32 वा वाढदिवस साजरा केला. या दोघांची लव्हस्टोरी देखील अतिशय रंजक व फिल्मी आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण या बांदेकर जोडीची लव्हस्टोरी अगदी त्यांच्या शाळेत असल्यापासून सुरू आहे. ‘खुप्ते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात त्यांनी आपली लव्हस्टोरी सांगितली आहे.

अभिनेत्री सुचित्रा बांदेकर नववीत असल्यापासून आदेश यांना त्या आवडत होत्या. त्यावेळी रथचक्र या मालिकेमध्ये त्या काम करत होत्या. त्यातल्या एका भागात आदेश यांचीही भूमिका होती. यावेळीच आदेश बांदेकर सुचित्रा यांच्या प्रेमात पडले.

नंतर सुचित्रा यांच्या शाळेच्या परिसरात आदेश अनेकदा त्यांना वेगवेगळ्या बहाण्यांनी भेटत होते. नंतर दोघेही रुपारेल कॉलेज ला एकत्र होते. तेव्हा त्यांच्या भेटीगाठी वाढल्या व त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली. आदेश यांनी सुचित्रा यांना एकदा दादरच्या हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले. त्यावेळी सुचित्रा यांनी देखील होकार दिला. मात्र मैत्रिणीसोबत हॉटेलपर्यंत गेलेल्या सुचित्रा आई-वडिलांच्या भीतीने त्यांना न भेटताच माघारी आल्या.

दादरमधून फिरून सुचित्रा त्याच्या घरी आल्या तेव्हा आदेश बांदेकर त्यांच्या आईसोबत गप्पा मारत बसले होते. यावेळी सुचित्रा यांच्या आई घराबाहेर पडल्या आणि त्यांच्या मागोमाग आदेश देखील बाहेर पडले. मात्र बस स्टॉपवर गेल्यानंतर काहितरी कारण सांगत तिथून निसटले आणि पुन्हा सुचित्रा यांच्या घरी आले.

यावेळी सुचित्रा यांना त्यांनी चिडून जाब विचारला. “भेटायचे न्हवते तर कशाला बोलावले ? आज मी तुला सोबत घेऊन सिद्धिविनायक किंवा महालक्ष्मीला जाणार होतो. आता 5 मिनिटांत मला नकार दे किंवा होकार दे. नकार दिला तर पुन्हा भेटणार नाही किंवा मागे देखील येणार नाही.”

5 मिनिटं होताच आदेश घरातून बाहेर पडू लागले. तेव्हा सुचित्रा अचानक म्हणाल्या ” केव्हा जायच महालक्ष्मी ला ?” झालं ! या नंतर आदेश व सुचित्रा यांची लव्हस्टोरी सुरू झाली. मालिका सिनेमांमध्ये एकत्र काम करता करता त्यांचे प्रेम बहरत होते.

मात्र आदेश यांच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने सुचित्रा यांच्या घरून या नात्याला विरोध होता. दरम्यान एकेदिवशी या दोघांनी देखील घरात न सांगताच अवघ्या 50 रुपयांमध्ये कोर्टात जाऊन लग्न केलं.

महत्वाच्या बातम्या 

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now