Birthday: अलिकडच्या काळात वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजर करण्याचे वेड तरुणांमध्ये खुपचं दिसून येत आहे. अगदी लहानपणापासून ते म्हातार्या माणसांपर्यंत सर्वांचेच वाढदिवस साजरे केले जाता आहेत. हौसेला मोल नाही, असे म्हटले जाते त्यात काही खोटं नाही. सध्या सोशल मीडियावर शिक्षकाच्या मुलाच्या वाढदिवसाची प्रचंड चर्चा रंगली आहे.
कारण या वाढदिवसाला शिक्षकाने त्याच्या मुलासाठी तब्बल २२१ किलोचा केक कापला आहे. एवढं नाही तर मुलाच्या आवडत्या गाडीचा आकार असलेला केक वडिलांनी बनवून घेतला आहे. या केकची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे. तसेच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
नवीत भोईर हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. नवीन भोईरे वसई पूर्वेकडील कामण या गावात राहतात. त्यांच्या लग्नाला सहा वर्षे उलटून गेली आहे. सहा वर्षानंतर रेयांशचा जन्म झाला. जन्म झाल्यानंतर त्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे रेयांशला तब्बल एक महिना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं.
नवीत भोईर आपल्या मुलाचं बारसं अगदी थाटामाटात करायचं होतं. पण रेयांशच्या आजारपणामुळे ते शक्य झाले नाही. त्यामुळे वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घरच्यांनी घेतली. मागच्या वर्षी वाढदिवसानिमित्त रेयांशला मुंबईहून हेलिकॉप्टरमध्ये आणण्यात आल होतं.
रेयांशच्या दुसऱ्या वाढदिवसाला तब्बल २१ किलोचा केक कापण्यात आला आहे. या केकची किंमत २ लाख ६५ हजार रुपये आहे. तसेच मिरवणूक देखील काढण्यात आली होती. यावेळी वाढदिवसानिमित्त चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व जादूगार तसेच लहान मुलांच्या खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान, नवीन भोईर सामाजिक कार्यकर्ते आहेत. कोरोनाच्या काळात त्यांनी २०० लोकांना धान्य वाटप केला आहे. दरवर्षी दहावीमध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना ते बक्षीसही देतात. यावेळी ते अपंग व्यक्तींना व्हीलचेअरचं वाटप करणारं आहेत.
महत्वाच्या बातम्या
‘शरद पवार गो बॅक’! पवारांच्या बालेकिल्ल्यातच शेतकऱ्यांनी दिला नारा; का चिडलाय बळीराजा? वाचा..
७७ वर्षांच्या आजोबांनी फक्त दूध अन् केळी खात सायकलवर गाठली कन्याकुमारी
‘सर कसंतरी करत आहेत, प्लिज लवकर चलाना म्हणत विद्यार्थी कळवळू लागले’; बाकीचे शिक्षक वर्गात जाताच…..