Apple: सफरचंद म्हटल की पहिला नाव समोर येत ते म्हणजे हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेशमध्ये सफरचंदाची (apple) शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. सफरचंदामुळे आशियातील (Asia) एक गाव सर्वात श्रीमंत गाव म्हणून ओळखले जाते आहे. हे गाव शिमला जिल्ह्यातील चौपालच्या मडावग येथील क्यारी हे आहे. या गावातील प्रत्येक कुटुंब करोडपती आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मडावग येथे 225हून आधी कुटुंब रहिवासी आहेत. तर त्यांतील जवळपास 175 कुटुंब फक्त सफरचंदाची शेती करतात. त्यांचे वार्षिक उत्पन्न 35 ते 80 लाखांचा दरम्यान आहे. आता मडावगचे दाशोली गाव सफरचंदांसाठी राज्यात ठसा उमटवत आहे.
तसेच, 12 ते 13 कुटुंबांनी देशातील सर्वोत्तम दर्जाच्या सफरचंदांचे उत्पादन सुरू केले आहे. दशोलीचा छोटा बागायतदारही 700 ते 1000 पेटी सफरचंद तयार करत असून मोठा बागायतदार 12 हजार ते 15 हजार बॉक्स सफरचंद तयार करत आहे.
दाशोलीतील बागायतदारांच्या बागा 8000 ते 8500 फूट उंचीवर आहेत. सफरचंदाच्या लागवडीसाठी ही उंची चांगली मानली जाते. तसे पाहता संपूर्ण मडावग गाव आणि संपूर्ण पंचायत सफरचंद लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. पण, मडावगच्या दाशोलीचे सफरचंद दर्जेदार किन्नोर आणि जम्मू काश्मीरच्या सफरचंदांनाही मागे टाकत आहे.
दरम्यान, छैयान राम मेहता यांनी 1953-54 मध्ये मडावग येथे सफरचंदाची लागवड सुरू केली. त्यानंतर झेलदार बुधी सिंग आणि काना सिंग डोगरा यांनी स्थानिक लोकांना सफरचंद शेती करण्यासाठी प्रवृत्त केले. त्या काळी बटाट्याची शेती हे या भागातील उत्पन्नाचे प्रमुख साधन होते.
त्यामुळे फार कमी लोक सफरचंदाची लागवड करत होते. 1980 पर्यंत बहुतेक लोकांनी सफरचंदाच्या बागा लावल्या होत्या. 2000 नंतर सफरचंद उत्पादनामुळे मडावग प्रदेश देशाच्या नकाशावर दिसायला लागला. आता येथील बागायतदारांनी सफरचंदाच्या एचडीपी (हाय डेन्सिटी प्लांटेशन) आधुनिक तंत्रज्ञानाकडे वाटचाल सुरू केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
एकनाथ शिंदे – उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार; शिंदे गटातील मंत्र्याने केला मोठा गौप्यस्फोट
प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच ‘या’ अभिनेत्रीवर होत जिवापाड प्रेम पण…
rishabh pant : ऋषभ पंत दारु पिऊन गाडी चालवत होता? उत्तराखंड पोलिसांनी समोर आणले अपघाताचे सत्य