Share

सर्वात मोठी ब्रेकींग न्युज! आता भाजपमध्येच मोठी उलथापालथ, देवेंद्र फडणवीसच झाले गायब

devendra fadanvis

Devendra Fadanvis: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपाशी हात मिळवणी करणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या भेटीगाठी वाढल्या असून त्यांचे बोलणे पुन्हा एकदा सुरू झाले आहे. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

त्यानंतर आता आमदारांची जमवाजमव करण्याचं काम देखील जोमानं सुरू आहे. माध्यमातील वृत्तानुसार, अजित पवार यांना राष्ट्रवादीच्या जवळपास ३० आमदारांचा पाठिंबा आहे. पण सध्या सुरू असलेल्या या चर्चांना खुद्द अजित पवार यांनी पूर्णविराम दिला आहे. यावरुन सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेचे दोन गट पडले. या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. तर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाले. मात्र, आता भाजपासाठी शिंदे गट हा बिनकामाचे ओझे झालं आहे. ते बिना कामाचं ओझं कसं फेकता येईल यावर महाराष्ट्र आणि दिल्लीत जोरदार चर्चा सुरू आहे.

तसेच राज्यातील सर्वात मोठी उलथापालथ राष्ट्रवादी नव्हे तर भाजपमध्येच सुरू असल्याचा दावाही अग्रलेखातून केला आहे. आश्चर्य म्हणजे कालचे बाहुबली देवेंद्र फडणवीस हे राज्यातील या सगळ्या उपक्रमातून बेपत्ता आहेत. त्यामुळे राज्यात भाजपातच सर्वात मोठी उलथापालथ सुरू आहे की काय? अशी शंका घ्यायला जागा आहे, असा दावा या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

कधी शिवसेना तर कधी राष्ट्रवादी यांच्यात फूट पाडून स्वतःचे घर भरण्याचं काम सुरू आहे. भाजपची काँग्रेसवरही वाईट नजर आहे. अजित पवार यांच्या भाजपसोबत जाण्याच्या वावड्या उडवून वातावरण गढूळ करण्याचं काम सुरू आहे. तसेच महाराष्ट्राला बदनाम करण्याचे देखील काम सुरू आहे. पण हे कारस्थान अजितदादांनी उधळून लावला आहे,‌ असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

दरम्यान, गेल्या काही आठवड्यांपासून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार संपर्काच्या बाहेर असून भाजपसोबत सरकार स्थापनेसाठी पावले उचलत असल्याची चर्चा होती. यावर अजित पवार यांनी पुन्हा एकदा स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले की, मीडियामध्ये जे काही सुरू आहे त्या सर्व अफवा आहेत. मी काल अनेक वेळा ट्विट केले की हे पूर्णपणे खोटे आहे. त्यावर कोणी सही केली हे मला माहीत नाही. मी नेहमीप्रमाणे काम करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या
सचिनच्या पोराने वाचवली रोहितची लाज, थरारक गुणत मुंबई हैद्राबादला 14 धावांनी हरवले; ‘हे’ ठरलेचे हिरो
‘मी एकनाथ विजयांचा फन’; ठाकरेंच्या बड्या नेत्याकडून प्रशंसा; ठाकुर गटाला पडणार खिंडार

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now