‘सर कसंतरी करत आहेत, प्लिज लवकर चलाना म्हणत विद्यार्थी कळवळू लागले’; बाकीचे शिक्षक वर्गात जाताच…..

मागील काही कालावधीत सर्वांनाच चिंता करायला लावणार्‍या बातम्या येत आहेत. त्या म्हणजे तरुणांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack ) होणारा मृत्यू. अगदी तंदुरुस्त दिसणारे व्यक्ती देखील ह्रदयविकाराच्या झटक्याचे बळी ठरत आहेत. आंध्र प्रदेशमध्ये चालू वर्गात शिकवत असताना एका शिक्षकाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्या शिक्षकांचे नाव पी. वीर बाबू असे आहे. ते ४५ वर्षांचे होते. आंध्र प्रदेश येथील बापटला जिल्यातील वेतापलेमच्या पालेम गावातील एका सरकारी प्राथमिक शाळेत ते शिक्षक म्हणून काम करत होते. वर्गात शिकवत असताना अचानक बाबू यांना अस्वस्थ वाटू लागले.

शिकवत असताना बेचेंन झाल्यामुळे बाबू हे खुर्चीवर बसले होते. परंतु, अचानक त्रास वाढला. त्यामुळे समोर असलेल्या विद्यार्थ्यांनी बांबू सरांची विचारपुस केली. पण ते काहीच बोलत नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी शाळेतील इतर शिक्षकांना ही माहिती दिली.

यावेळी, शिक्षकांनी तात्काळ १०८ नंबरवर फोन करून रुग्णवाहिका बोलावली आणि त्यांना दवाखान्यात दाखल केले. मात्र, वेळ निघून गेलेली होती. रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांने बांबू यांची नाडी तपासली. त्यावेळी त्यांना मृत्यू घोषित करण्यात आले. ही घटना विद्यार्थ्यांसमोर घडली. त्यामुळे शाळेत खळबळ उडाली.

काही महिन्यांपूर्वी समोर शिकवत असलेल्या शिक्षकाचा अचानक मृत्यू झाल्यामू विद्यार्थ्या देखील घाबरुन गेले. तर अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रू आले. वीरा बाबू हे दुसर्‍या गावातून नोकरीसाठी येत असायचे. त्यांच आणि विद्यार्थ्यांच एक वेगळच नातं निर्माण झालं होतं. पण अचानक झालेल्या मृत्यूमुळे विद्यार्थी देखील स्तब्ध झाले आहे.

दरम्यान, गेल्या २ आठवड्यापासून तेलंगणामध्ये ह्रदयविकाराच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. हैदराबादमध्ये बॅडमिंटन खेळताना एका व्यक्तीचा २८फेब्रुवारीला मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव शाम यादव आहे. ते ३८ वर्षानचे होते. ऑफिसची काम लवकर आवरुन ते इंडोर स्टेडियमवर बॅडमिंटन खेळायला गेले होते. त्यावेळी अचानक ते खाली पडले आणि त्यांचा मृत्यू झाला.

महत्वाच्या बातम्या
‘शरद पवार गो बॅक’! पवारांच्या बालेकिल्ल्यातच शेतकऱ्यांनी दिला नारा; का चिडलाय बळीराजा? वाचा..
७७ वर्षांच्या आजोबांनी फक्त दूध अन्‌ केळी खात सायकलवर गाठली कन्याकुमारी  
वारं फिरलं! कॉंग्रेस राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले ४५ नेते पुन्हा घरवापसी करणार; अजितदादांचा